Team My Pune City – गणेश विसर्जन मिरवणुकीच्या(Pimpri) गर्दीत पिंपरीतील जयका चौकात एका तरुणावर जुन्या भांडणाच्या कारणावरून पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केला. हातातील कड्याने डोक्यावर वार करून तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी अद्याप फरार आहेत.
हि घटना 4 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 ते 10 वाजता जयका चौक, पिंपरी येथे घडली. फिर्यादी अक्षय अमरजीत प्रसाद (वय 25 रा. काळेवाडी, पिंपरी) हे दोन मित्रांसह गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी थांबले होते.
त्याच वेळी आरोपी बॉबी संधू (वय अंदाजे 25), हितेश कुकरेजा (वय अंदाजे 25), विनय हिगोंराणी (वय अंदाजे 23), अश्रप शेख (वय अंदाजे 22) व आशपाक शेख (वय अंदाजे 26, सर्व रा. पिंपरी) हे पाच जण घटनास्थळी आले. आरोपी बॉबी संधू याने फिर्यादीस जुन्या वादाच्या कारणावरून विचारणा केली. त्यानंतर सर्व आरोपींनी मिळून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यामध्ये आरोपींनी हातातील कड्याने फिर्यादीच्या डोक्यावर वार केला तसेच तोंडावर, पोटावर व बरगडीवर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. फिर्यादीसोबत असलेल्या मित्रांनाही शिवीगाळ करून हाताने मारहाण करण्यात आली.
Bhaje Maval: श्री शिवाजी उदय मित्र मंडळ भाजे गणेशोत्सव मंडळाचा आकर्षक देखावा
Nana Peth Murder : असा होता खुनाचा घटनाक्रम, नाना पेठेत आज कडक बंदोबस्त
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.