situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri: श्वानांना विषारी औषध देऊन मरणाऱ्या संशयितास अटक

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – पिंपरी मधील महिंद्रा अॅंथिया सोसायटी मध्ये १२ श्वानांवर विषप्रयोग केल्याची घटना १३ एप्रिल रोजी घडली होती. त्याबाबत संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी तपास करत एका संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडे पोलीस तपास करीत आहेत. अलौकिक राजू कोटेच्या (३७, महिंद्रा सोसायटी, पिंपरी) असे अटक केलेल्या संशयित व्यक्तीचे नाव आहे.

पिंपरी – चिंचवड शहरातील पिंपरी परिसरातील मध्यवर्ती भागात महिंद्रा अॅंथिया नावाची मोठी सोसायटी आहे. १४ एप्रिल सकाळी या सोसायटीमध्ये वावरणाऱ्या १२ श्वानांवर विषप्रयोग केल्याचे उघड झाले. विषप्रयोग केल्यानंतर तीन श्वानांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, उपचारादरम्यान आणखी नऊ श्वानांचा मृत्यू झाला. महिंद्रा अॅंथिया सोसायटीच्या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून २० ते २२ भटके श्वान राहत आहेत.

Pune Crime News 16 May 2025 : लोहगावमध्ये बंद घर फोडून १.७९ लाखांचा ऐवज लंपास

श्वानांवर विषयप्रयोग केल्याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तसेच साक्षीदारांकडे तपास करून संशयित आरोपी निष्पन्न केला. त्याला १३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली आहे. घटना घडण्यापूर्वी आरोपी सोसायटी परिसरात कार मधून सातत्याने फिरत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या मोबाईलची पाहणी केली. त्यामध्ये पोलिसांना काही गोष्टी संशयास्पद आढळून आल्या आहेत.


श्वानांवर विषप्रयोग केल्याप्रकरणी एका संशयिताला अटक केली आहे. घटनेच्या दिवशी तो सतत घटनास्थळी फिरताना दिसत आहे. तसेच त्याच्या मोबाईल मध्ये काही संशयास्पद गोष्टी आढळल्या आहेत. तपासात आणखी काही गोष्टी समोर आल्या तर त्यानुसार कारवाई केली जाईल.

वनिता धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संत तुकाराम नगर

Follow Us On