Team My pune city – एएसएम (सीएसआयटी) कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुर्णानगर यांच्या वतीने अकरावीत प्रवेश (Pimpri News) घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी नियोजित प्रशिक्षण कार्यक्रम (Induction program) नुकताच आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिता इंडिया फॉउंडेशनच्या संस्थापिका डॉ. रिता मदनलाल शेटीया तर उपाध्यक्ष ज्युपिटर हॉस्पिटल चे मेंदू विकास तज्ञ् डॉ. नरेंद्र मोटारवार होते. तसेच एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट चे डायरेक्टर डॉ. व्ही. पी. पवार, एएसएम चे कार्यकारी संचालक डॉ. डी . डी . बाळसराफ उपस्थित होते.
यावेळी डॉ. रिता शेटीया यांनी ‘विविध शिष्यवृत्ती आणि प्रेरणादायी मार्गदर्शन’ करत विद्यार्थ्यांना ध्येय ठरवा, जिद्दीने त्यासाठी मेहनत करा आणि यशस्वी व्हा. तसेच प्रेरणादायी व्हिडीओ द्वारे मुलांशी सवांद साधत, तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी कुणीही अडवू शकत नाही केवळ तुम्हीच आहात जे स्वतःला रोखू शकता. कधीही हार मानू नका. स्वतःला प्रत्येक दिवशी रिचार्जे करत राहा त्यासाठी रोज व्यायाम , प्राणायाम, योग आणि एखादा छंद जोपासा ज्यामुळे तुम्ही (Pimpri News) नेहमी फ्रेश राहाल. शिक्षण घेत असताना येणाऱ्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी विविध शिष्यवृत्ती विषयीची सविस्तर माहिती त्यांनी दिली. तर डॉ. नरेंद्र मोटारवार यांनी तुम्हाला भविष्यात काय करायचे आहे ते आताच ठरवा हीच योग्य वेळ आहे असे सांगितले.
यावेळी डॉ. पवार म्हणाले, आजची पिढी मोबाइल च्या अधीन झाली आहे यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी प्रयत्न करावे आणि त्यांचा कल अभ्यासाकडे वाढवावा. तर डॉ. बाळसराफ म्हणाले, तुमच्यातील चांगले आणि वाईट गुण तपासा, आलेल्या प्रत्येक संधीचा फायदा करून घ्या आणि वेळीच धोका (Pimpri News) ओळखा.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पालक आणि विद्यार्थी दोन्ही २०० पेक्षा जास्त संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांन बरोबर पालकांची उस्फुर्त प्रतिसाद दिला. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध कला गुण सादर करत शिक्षकांनी वर्षभरातील नियोजनाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कॉलेज च्या प्रिन्सिपल अपर्णा मोरे , सर्व शिक्षिका , शिक्षकेत्तर वर्ग यांचे मोलाचे (Pimpri News) सहकार्य लाभले.