situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri News : संघटनेसाठी दररोज एक तास द्या, ताकत देऊ

Published On:
Pimpri News

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

Team MyPuneCity – पूर्वी एका रात्रीत सभासद नोंदणी केली जात (Pimpri News) होती. समोरचे नेतृत्व ही नोंदणी कशी झाली हे बघणारे नव्हते. आताचे नेतृत्व संघटना कशी वाढविली जाते हे डोळसपणे बघणारे आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः लक्ष ठेवून सभासद नोंदणी करून घेत आहेत. नोंदणीची पडताळणी करत आहेत.काम करणारे आणि काम चुकार कार्यकर्ते हे आम्हाला ओळखता येते. त्यामुळे संघटनेसाठी दररोज एक तास द्यावा. ताकत देण्याचे काम आमच्याकडून  केले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री, पुणे जिल्ह्याचे संपर्क नेते उदय सामंत यांनी दिली. 

Moshi Murder : आर्थिक वादातून कोयत्याने वार करत खून

पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेची गुरुवारी आढावा बैठक सामंत (Pimpri News) यांच्या उपस्थितीत कासारवाडी येथे झाली. शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे, उपनेत्या सुलभा उबाळे,  युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजित  बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, गितांजली ढोणे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश वाबळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरदराव हुलावळे, युवासेना जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस, शिवसेना पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख निलेश तरस, शिवसेना महिला शहरसंघटिका सरिताताई साने, युवा सेना शहर प्रमुख माऊली जगताप,माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ,माजी नगरसेवीका विमल जगताप,शिलाताई भोंडवे,राम सावंत,सुनिल हगवणे,संजय भोईर,दिपक चौधुले,रितू कांबळे,सायली साळवी,सुदर्शन दिसले व मोठ्या संखेने प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 मंत्री उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची (Pimpri News) निवडणूक लढविली. महायुतीला चांगले यश मिळाले. लाडकी बहिणीसह विविध लोकोपयोगी योजना राबविल्या. त्याचा शिवसेनेसह महायुतीला मोठा फायदा झाला आहे. केवळ शिवसेना सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यासाठी आलो नाही, तर कार्यकर्त्यांनां न्याय देण्यासाठी आलो आहे. कार्यकर्त्यांना बळ दिले जाईल. मी आणि खासदार श्रीरंग बारणे कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आहोत. कार्यकर्त्यांना बळ देणे शिवसेनेचे काम आहे. कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे. पक्षासाठी दररोज एक तास द्यावा. त्यामुळे संघटन अधिक मजबूत, सक्षम होईल. 

पूर्वी एका रात्रीत सभासद नोंदणी केली जात होती. समोरचे नेतृत्व ही नोंदणी कशी झाली हे बघणारे नव्हते. आताचे नेतृत्व संघटना कशी वाढविली जाते हे डोळसपणे बघणारे आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः लक्ष ठेवून सभासद नोंदणी करून घेत आहेत. नोंदणीची पडताळणी करत आहेत. शिवसेनेचा निवडणुकांचा पाया हा सभासद नोंदणी आहे. त्यामुळे ती प्रामाणिकपणे (Pimpri News) पार पाडली पाहिजे. शिंदे कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतात. त्याच्या दहा टक्के भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. घराघरामध्ये जाऊन सभासद नोंदणी करावी. त्यामुळे आपले, परके कळतील. घरात जाऊन आपला विचार रुजविला पाहिजे. काम करणारे आणि काम चुकार कार्यकर्ते हे आम्हाला ओळखता येते. सर्वांना विश्वासात घेऊन शासकीय समित्यांची पदे वाटली जातील. जो काम करेल, ज्याची ताकद असेल तोच महापालिकेची निवडणूक लढविणार आहे, असेही सामंत म्हणाले.

खासदार बारणे म्हणाले, आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना सदस्य नोंदणी हे चांगले माध्यम आहे. पिंपरी, चिंचवड, मावळमध्ये घरोघरी जाऊन सभासद नोंदणी करावी. त्याचा आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत फायदा होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे किती काम करतात, त्याचे अनुकरण करून पक्षासाठी काम करावे. पूर्वी घर बसल्या फॉर्म भरून सभासद नोंदणी केली जात होती. इतर पक्षही तसे करतात. परंतु, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच घरोघरी जाऊन ऑनलाइन सभासद नोंदणी केली जाते.  सदस्य नोंदणीत मावळ मतदारसंघ राज्यात 4 स्थानावर आहे. संघटनेसाठी थोडा वेळ दिला तर 100 टक्के सभासद नोंदणी पूर्ण (Pimpri News) होईल.

Follow Us On