Team MyPuneCity – सिगारेट मागितल्याने झालेल्या वादातून (Pimpri Murder Case) तरुणाचा दगडाने ठेचून निर्घुण खून केला. रविवारी (दि. १) सकाळी सात वाजताच्या सुमारास पिंपरीतील विठ्ठल नगर परिसरात हा प्रकार उघडकीस आला.
अक्षय संजय ठोके (वय २६, रा. साईकृपा हाऊसिंग सोसायटी, विठ्ठल नगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई वंदना संजय ठोके (वय ४५) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्वास भीमा शिंदे (वय २८, रा. विठ्ठल नगर, पिंपरी) याला संत तुकाराम नगर पोलिसांनी अटक केली आहे.
Alandi : माऊलींच्या रथाच्या बैलजोडीचे माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते पूजन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विश्वास आणि अक्षय हे एकमेकांच्या ओळखीचे आहे. विश्वास याने अक्षय याच्याकडे सिगारेट मागितल्याने त्यांच्यात वाद झाला. यावेळी अक्षय याने विश्वासला सिमेंटचा ब्लॉक फेकून मारला मात्र तो त्याने चुकवला. या रागातून विश्वास याने दुसरा त्रिकोणी सिमेंट ब्लॉक घेऊन अक्षय याच्या डोक्यात तीन ते चार वेळा मारले.
यामध्ये अक्षय गंभीर जखमी झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी विठ्ठल नगर येथे साईकृपा हाऊसिंग सोसायटीच्या बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये अक्षय याचा रक्ताच्या थारोळ्यत पडलेला मृतदेह आढळून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी विश्वास याला अटक केली असून पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोरख कुंभार अधिक तपास करीत (Pimpri Murder Case) आहेत.