Team MyPuneCity – सांगवी परिसरातील शिवसृष्टी उद्यान (तानाजीराव शितोळे उद्यान), छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आणि सावतामाळी या उद्यानांना आमदार शंकर जगताप यांनीमहापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत भेट दिली. उद्यानातील तुटलेले झोके, पाण्याअभावी सुकलेली झाडे, उद्यान परिसरात दारुड्याचा वावर असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आमदार जगताप यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
यावेळी माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, माजी नगरसेवक संतोष कांबळे, प्रशांत शितोळे, सामाजिक कार्यकर्ते जवाहर ढोरे, सारिका भंडलकर, माजी सिनेट सदस्य संतोष ढोरे, गणेश सहकारी बॅक संचालक प्रमोद ठाकर, हेमंत निगुडकर, महानगर बॅंक संचालक नितीन खोडदे, शारूख सय्यद, अमोल गायकवाड, वैभव ढोरे, विशाल सोमवंशी, प्रदीप झांजुर्णे, अमित गवळी, योगेश मोहारे, विनायक शिंदे, सुजित पोंगडे, गणेश ढोरे आदी उपस्थितीत होते.
Pimpri Chinchwad Crime News 10 May 2025 : भाड्याने दिलेली कार गहाण ठेवून फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

उद्यान विभागाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करीत आमदार जगताप यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
आमदार जगताप म्हणाले की, शाळांना सुटी आहे. मोठया संख्येने बाल गोपाळ उद्यानात खेळण्यासाठी आणि बागडण्यासाठी येतात. मुलांना सुरक्षितपणे खेळण्यासाठी तातडीने खेळण्याची दुरुस्ती करा. नादुरुस्त आणि खराब खेळण्यामुळे अपघात होऊ शकतो, त्यामुळे ती खेळणी काढून टाका. पाण्याअभावी झाडे व हिरवळ सुकणार नाही याची दक्षता घ्या. सुरक्षारक्षक नेमून उद्यान परिसरात दारुड्याचा बंदोबस्त करा, अशा सक्त सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
Pushpalata D. Y. Patil Hospital: आंबी येथे लवकरच सुरु होणार भव्य ‘पुष्पलता डी. वाय. पाटील हॉस्पिटल’
आमदार शंकर जगताप यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. त्याचा रोष पाहून उपस्थित पदाधिकारी, माजी नगरसेवक, नागरिक आवक झाले. यानंतर तरी उद्यान विभागाच्या कामकाजात योग्य ती सुधारणा होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.