Team My Pune City –पिंपरी चिंचवड मराठी पत्रकार संघ आणि ईशा नेत्रालय पुणे विभाग (Pimpri)यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि. 3 ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड मधील पत्रकार व कुटुंबियांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार संघाचे शहराध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर यांनी दिली.
रविवार दि. 3 ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळात ईशा नेत्रालय, प्रीमियर प्लाझा, बिग बजार, पहिला मजला, कार्निवल सिनेमाच्या बाजूला जुना पुणे मुंबई महामार्ग चिंचवड स्टेशन येथे हे नेत्रचिकित्सा शिबीर होणार आहे.
Mahadev Puja Rituals: श्रावण विशेष महादेवाची पूजा विधी आणि आरत्या
नेत्रचिकित्सा शिबिराचे उद्घाटन ईशा नेत्रालयाचे पुणे ब्रांच इन्चार्ज दीपक कदम यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आधुनिक पद्धतीने नेत्र तपासणी करण्यात येणार असून त्याबरोबरच डोळ्यांचे आजार तसेच डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत डॉ. वैभव अवताडे,डॉ. जयशील नाझरे मार्गदर्शन करणार आहेत. नेत्रालयाचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह यशवंत बो-हाडे यांचे शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले असल्याची माहिती सातुर्डेकर यांनी दिली.