Team My Pune City – नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या मार्फत पिंपरी येथे आयोजित(Pimpri) केलेल्या गणेश मूर्ती विसर्जन व संकलन केंद्राला नागरिकांकडून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल चार हजार पेक्षा अधिक गणेश मूर्तींचे या ठिकाणी विसर्जन करण्यात आले. या उपक्रमासाठी वाघेरे यांच्या वतीने नागरिकांच्या सेवेसाठी सुमारे 60 X 200 फूट आकाराच्या मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती. ज्यामध्ये दोन विसर्जन हौद आणि गणपती आरती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात आले होत्या.
संदीप वाघेरे यांनी विसर्जनासाठी आलेल्या गणेश भक्तांसाठी महाप्रसादाची देखील व्यवस्था केली होती. घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे देखील या ठिकाणी विसर्जन करण्यात आले. नदी प्रदूषण टाळून केलेल्या पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेसाठी सर्वांनी मदत केली. या केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने व पर्यावरणपूरक मार्गाने मूर्ती विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले. विविध सामाजिक संस्थांचा, स्वयंसेवकांचा आणि युवकांचा देखील या उपक्रमात सक्रिय सहभाग दिसून आला.
Nana Peth Crime News : कोमकरचा खून प्रकरणी बंडू आंदेकरसह अकरा जणांवर गुन्हा
Jambhavede: गणेशोत्सवात महिलांसाठी खास आकर्षण – “खेळ रंगला पैठणीचा”!
संदीप वाघेरे म्हणाले, आपल्या परंपरांचे जतन करताना पर्यावरण रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. मूर्ती संकलन व विसर्जन केंद्र हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पुढली वर्षी अधिक व्यापक स्वरूपात हा उपक्रम राबविणार आहे.”
