Pimpri
मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांची माहिती
Team MyPuneCity – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर मनसेच्या ( Pimpri) वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसाच्या नियोजना संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये मनसेचे नेते गणेश आप्पा सातपुते व महेश बैसाने यांनी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, अशी माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
राज ठाकरे यांच्या पर्यावरणविषयक जाणीवेचे अनुकरण करत, त्यांच्या वाढदिवस दिनी म्हणजेच दि.१४ जून २०२५ रोजी, पिंपरी चिंचवड शहरातील विविध ठिकाणी १००० झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. या उपक्रमात मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शहराचे पर्यावरण सुधारण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल असून, प्रत्येक नागरिकाने यात सहभाग घ्यावा, असे आवाहन मनसेने केले आहे.

Crime News : पत्नीवर अत्याचार करण्यास मित्रांनाच पाडले भाग ; आरोपी पतीसह तिघांना यवत पोलिसांकडून अटक
दरम्यान, दि. २५ जून २०२५ रोजी, अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी, पिंपरी चिंचवड, पुणे येथे महारोजगार व रोजगाराभिमुख प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत होणाऱ्या या मेळाव्यात नामांकित कंपन्या, औद्योगिक संस्था, प्रशिक्षण केंद्रे व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. या उपक्रमात रोजगाराच्या संधींबरोबरच विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती व नोंदणीची सुविधा उपलब्ध असणार ( Pimpri) आहे.
Kamshet Crime News : कामशेतमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमात तरुणावर हल्ला; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
हा मेळावा नवयुवक, बेरोजगार, महिला व विविध क्षेत्रातील इच्छुकांना स्वतःची क्षमता वाढविण्याची आणि रोजगाराच्या संधी मिळविण्याची सुवर्णसंधी आहे. या दोन्ही उपक्रमांमधून मनसेच्या सामाजिक बांधिलकीचा व सकारात्मक बदल घडविण्याच्या दृष्टिकोनाचा प्रत्यय येतो. पिंपरी चिंचवडमधील सर्व नागरिकांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन शहराध्यक्ष सचिन चिखले ( Pimpri) यांनी केले आहे.