situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri-Chinchwad: श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराजांची पारंपरिक द्वारयात्रा २५ जुलैपासून सुरू

Published On:

चारही दिशांच्या देवीस्थळी होणार धार्मिक विधी, हजारो भाविक सहभागी होण्याची अपेक्षा

Team My Pune City – चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज(Pimpri-Chinchwad) यांच्या सालाबादप्रमाणे होणाऱ्या पारंपरिक द्वारयात्रेला यंदा २५ जुलैपासून प्रारंभ होणार आहे. श्रावण शुद्ध प्रतिपदेपासून ते चतुर्थीपर्यंत, म्हणजे चार दिवस चालणाऱ्या या धार्मिक यात्रेची घोषणा चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांनी केली.

या द्वारयात्रेची परंपरा अनेक दशकांपासून चालू असून, श्रीमोरया गोसावी महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरातून यात्रेला दररोज सकाळी ९ वाजता शुभारंभ होतो. यात्रेच्या सुरुवातीला श्री चिंतामणी महाराज यांच्या समाधीस्थळी धूपारती, नंतर सुमारे १०० ते १५० भाविकांचा वाजतगाजत यात्रेचा समुदाय श्री मंगलमूर्ती वाड्यातून मार्गस्थ होतो.

Bicycle rally : सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या सायकल रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद


Atrocities Act : जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीची बैठकित ॲट्रोसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्यांचा आढावा

यात्रेदरम्यान चारही दिशांना असलेल्या द्वारदेवींच्या मंदिरांना भेट दिली जाते. प्रत्येक ठिकाणी पूजन, गोंधळ, जोगवा व धार्मिक स्तोत्रांचे गायन होते. या आध्यात्मिक वातावरणात श्रद्धेने न्हालेल्या भाविकांचा सहभाग लक्षणीय असतो. यात्रेच्या दररोजच्या सांगतेनंतर देवस्थान ट्रस्टतर्फे महाप्रसाद वाटप करण्यात येतो.

🔹 द्वारयात्रेचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे:

  • २५ जुलै – पूर्वद्वार: एम्पायर इस्टेट सोसायटी, चिंचवड स्टेशन येथील श्री मांजराई देवी मंदिर
  • २६ जुलै – दक्षिणद्वार: वाकड येथील श्री आसराई देवी मंदिर
  • २७ जुलै – पश्चिमद्वार: रावेत येथील श्री ओझराई देवी मंदिर
  • २८ जुलै – उत्तरद्वार: आकुर्डी येथील श्री मुक्ताई देवी मंदिर व श्री खंडोबा मंदिर

या चारही दिवशी शहरात धार्मिक व आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार असून, शेकडो भाविक यात्रेत सहभागी होऊन भक्तिभाव व्यक्त करणार आहेत.

देवस्थान ट्रस्टने नागरिकांना यात्रेमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. यात्रेच्या आयोजनासाठी सुरक्षा, वाहतूक व सुविधा यांची पूर्ण तयारी करण्यात आल्याची माहिती मंदार देव महाराज यांनी दिली.

🛕 “ही परंपरा केवळ एक धार्मिक विधी नसून, चिंचवडच्या आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे. प्रत्येक वर्षी यात्रेत नागरिकांचा वाढता सहभाग ही श्रद्धेची साक्ष आहे,”

— मंदार देव महाराज, मुख्य विश्वस्त, चिंचवड देवस्थान ट्रस्ट.

Follow Us On