situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad: “शिव महाआरती”ने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी सोहळयाची सांगता

Published On:

अहिल्यादेवींचे आदर्श विचार समाजात रुजविण्याचे प्रोत्साहन मिळाले – शत्रुघ्न (बापू) काटे

Team MyPuneCity – शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्रिशताब्दी समारोहाची सांगता शनिवार, दि. ३१ रोजी सायंकाळी मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिरात महिलांच्या हस्ते भव्य ‘शिव महाआरती’ चे आयोजन करून या आठ दिवसीय सोहळयाची सांगता झाली.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दीचे संयोजक विजय (शीतल) शिंदे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, माजी उपमहापौर केशव घोळवे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, माजी नगरसेविका निर्मलाताई कुटे, जयनाथ काटे, सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, कुंदाताई भिसे, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, उपाध्यक्ष कैलास सानप, बिभीषण चौधरी, मंडलाध्यक्ष अनिता वाळुंजकर, संदेश काटे, माजी मंडलाध्यक्ष सोमनाथ भोंडवे, सामाजिक कार्यकर्ते दिपक भोंडवे, महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली खाडये, गणेश वाळुंजकर, गणेश आर. ढाकणे, मनोज ब्राम्हणकर, अभिजित बोरसे, भुषण जोशी, सत्यनारायण चांडक, सीमा चव्हाण, ज्ञानेश्वर हांडे यांच्यासह प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, मोर्चा/आघाडी/प्रकोष्ठ प्रमुख, मंडल पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे स्मरण करून, त्यांना आदरांजली वाहिली. तसेच, हा जयंती कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. महिलांच्या मोठ्या उपस्थितीने आणि त्यांच्या हस्ते झालेल्या शिव महाआरतीने हा सोहळा अधिकच भक्तिमय आणि अविस्मरणीय ठरला. या कार्यक्रमामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतींना उजाळा मिळाला आणि त्यांच्या आदर्श विचारांना पुन्हा एकदा समाजात रुजविण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

Express Way Accident : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात : पंक्चर काढत असलेल्या दोघांना भरधाव मिक्सरने उडवलं; जागीच मृत्यू

भाजप प्रदेश कार्यालयातर्फे प्रत्येक जिल्हास्थानी कार्यक्रम आयोजनाबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकरभाऊ जगताप, विधान परिषद आमदार उमाताई खापरे, अमितजी गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभांमधील १४ मंडलनिहाय दि. २४ ते ३१ मे २०२५ या कालावधीत अहिल्यादेवी जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात पार पाडण्यात आला. यामध्ये, नदी घाट स्वच्छता, वत्कृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, बुध्दीजीवी व पत्रकारांचा परिसंवाद, पुरस्कार सोहळे घेण्यात आले. यामध्ये, शहरातील लहान थोरांपासून अबालवृध्दांनी सहभाग घेत अहिल्यादेवींच्या कार्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दीचे संयोजक विजय (शीतल) शिंदे यांनी केले. आभार मोरेश्वर शेडगे यांनी मानले.

Follow Us On