Team My pune city –श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने 2018 मध्ये (Pimpri-Chinchwad)लावलेले समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेचे छोटेसे रोपटे आज सात वर्षांच्या प्रवासानंतर भक्कम वटवृक्षाच्या रुपात उभे आहे. इंद्रायणी नगर येथे संस्थेचा वर्धापन दिन थाटामाटात व उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी जवळपास 500 हून अधिक सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून भोसरी स्पाईन रोड पोलीस स्टेशनच्या API सोनाली गोडबोले, स्थायी समिती अध्यक्षा व नगरसेविका सीमाताई सावळे, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनीताई वाबळे, गीताताई महेंद्रु, वर्षाताई मुंडे, डॉ. दिपाली कुलकर्णी व सुनीताताई शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभली.
Madhav Bhandari : अर्बन नक्षलवादाचे जनक काँग्रेसच – माधव भांडारी
Lonavla Rain : लोणावळ्यात 24 तासात 432 मिमी पावसाची नोंद, जनजीवन विस्कळीत
पुरस्कार वितरण
कार्यक्रमात सक्षम झालेल्या उद्योजिकांचा सन्मान करण्यात आला.
सक्षम उद्योजिका पुरस्कार : स्मिताताई वडघुले, ज्योतीताई मुऱ्हे, वंदना म्हसे
आधारस्तंभ पुरस्कार : रेवतीताई बलकवडे
सदस्य वाढवणाऱ्या : शुभांगी ताई महाबरे
SMBS तत्पर पुरस्कार : सीमाताई जोशी
समन्वयिका पुरस्कार : उषाताई लेंडवे
उत्तम ग्राहक पुरस्कार : मनीषाताई शिंदे
तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून सक्षम झालेल्या सहा उद्योजिकांनाही गौरवण्यात आले. त्यामध्ये मनीषाताई चव्हाण (सातारा), अश्विनीताई पाटील (तळेगाव), कल्पनाताई जाधव (छत्रपती संभाजीनगर), रीना ढवगावे (नाशिक), संजीवनी बांगर ( मंचर) ,माधुरीताई गावंडे (देहूरोड) आणि स्मिता वाकळे (दिघी रोड) यांचा समावेश आहे.
प्रेरणादायी मार्गदर्शन
API सोनाली गोडबोले यांनी महिलांना स्वसुरक्षा, डिजिटल स्कॅम आणि आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी मार्गदर्शन केले. नगरसेविका सीमाताई सावळे यांनी महिलांनी अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवण्याचे आवाहन केले.
सांस्कृतिक कार्यक्रम
कार्यक्रमात महिलांनी नृत्य व गीतांच्या सादरीकरणाने रंगत आणली. गणेश वंदना, देवीचा गोंधळ, रेट्रो डान्स आणि फुलवंतीचा डान्स प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला. सर्व उपस्थित महिलांनीही नृत्यात सहभागी होऊन आनंद लुटला.
संस्थेचे कार्य
संस्थेच्या अध्यक्षा राजश्रीताई गागरे यांनी महिलांच्या व्यवसायातील सहभागाचे महत्त्व आणि संस्थेमार्फत सक्षम झालेल्या महिलांची कामगिरी उपस्थितांना सांगितली. उपाध्यक्ष माधुरीताई मुंडे, खजिनदार जयश्रीताई काळे, सांस्कृतिक प्रतिनिधी संगीताताई लांडे, सोशल मीडिया प्रतिनिधी सोनल मलातपुरे आणि संपूर्ण कोअर टीमने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. पडवळ यांनी केले. चैताली 9 वार यांनी लकी ड्रॉसाठी बक्षिसे दिली तर शिवशाही पैठणी यांनी मानाची पैठणी देऊन उपस्थितांचा सन्मान केला.