Team My pune city –आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी (९ जुलै) केलेल्या संपामध्ये पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्यातील शासकीय कर्मचारी, शिक्षक सहभागी झाले. शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाल्याने शासकीय कार्यालयांना टाळे लागले. त्यामुळे नागरिकांची शासकीय कार्यालयातील कामे खोळंबली.
चार कामगार (कायदे) संहिता रद्द कराव्यात. शिक्षकांचा १५ मार्च २०२४ रोजीचा संघमान्यतेचा आदेश रद्द करावा. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करावा. सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अधिसूचना घोषित करावी. दहा वर्ष सतत काम करणाऱ्या सर्व कंत्राटी, अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्यात. प्रतीक्षा यादीतील सर्व पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या द्याव्यात. केंद्राप्रमाणे एक जानेवारी २०२५ पासून दोन टक्के महागाई वाढ भत्ता मंजूर करावा. शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० करावे. चतुर्थश्रेणी कर्मचारी, वाहनचालक भरतीवरील बंदी तात्काळ उठवावी, अशा मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.
Lohagad: लोहगड आणि विसापूर किल्ल्यांना तारेच्या कंपाउंडचा वेढा, शिवप्रेमींमध्ये नाराजी
Alandi: इंद्रायणी नदी घाटावर ड्रेनेज गळती मुळे परिसर अस्वच्छ:भक्त पुंडलिक मंदिरात अस्वच्छ पाणी
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ तालुक्यातील शेकडो शासकीय कर्मचारी सहभागी झाले. मागण्या पूर्ण करण्याबाबत निवेदन देण्यात आले. मागण्या पूर्ण न झाल्यास सप्टेंबर महिन्यात अधिक तीव्र स्वरूपाचे अंदोलन केले जाणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मंडल अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, अपर तहसीलदार कार्यालय बुधवारी बंद होते. त्यामुळे नागरिकांची कामे होऊ शकली नाहीत. बंद कार्यालयासमोर नागरिकांनी बराच वेळ घालवला. मात्र त्यांचे काम न झाल्याने त्यांना परत घर गाठावे लागले.