Team MyPuneCity – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ( Pimpri-Chinchwad Police Commissionerate) दोन नवीन पोलीस उपायुक्त आले आहेत. त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झोन एकच्या पोलीस उपायुक्तपदी संदीप आटोळे यांची तर मुख्यालयातील पोलीस उपायुक्तपदी श्वेता खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Yamanotri Dham : उत्तराखंडमध्ये यमनोत्री धाममध्ये महाराष्ट्रातील 200 प्रवास अडकले
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे आणि स्वप्ना गोरे यांची बदली झाल्यानंतर पोलीस विभागात वरिष्ठ पातळीवर फेरबदल करण्यात आले. गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी डॉ. शिवाजी पवार, परिमंडळ तीनच्या उपायुक्तपदी बापू बांगर आणि वाहतूक विभागात विवेक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर परिमंडळ एक आणि मुख्यालय उपायुक्त पदांची जागा रिक्त होती.
या दोन्ही जागांवर नव्याने आलेल्या संदीप आटोळे आणि श्वेता खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. आटोळे हे अनुभवी आणि कार्यकुशल अधिकारी म्हणून ओळखले जात असून झोन १ मधील वाढत्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. श्वेता खेडेकर यांनी मुख्यालयात पोलीस उपायुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला असून, प्रशासकीय कामकाज, अंतर्गत समन्वय आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत त्यांचा मोलाचा सहभाग राहणार ( Pimpri-Chinchwad Police Commissionerate) आहे.