Team My Pune City – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ( Pimpri-Chinchwad Police)ऑगस्ट महिन्यात काळेवाडी मधील निंबाळकर टोळी, निगडी मधील ढाका (बिष्णोई) टोळी, आवाड टोळी आणि चिखली मधील नानावत टोळी या चार टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. तीन अट्टल गुन्हेगारांना नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे. तर ४१ गुन्हेगारांना तडीपार केले आहे. आगामी सण, उत्सव आणि निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी या कारवाया केल्या आहेत.
Pimpri Chichwad Crime News 04 September 2025 : मोबाईल घेतल्याच्या रागातून दोघांना मारहाण
काळेवाडी परिसरातील निंबाळकर टोळीचा प्रमुख अभिषेक निंबाळकर, त्याचे साथीदार अनुज गोळे, हर्ष महाडिक, सुजल कोरे, आयुष खैरे, सागर शिंदे, आकाश उर्फ गोट्या पवार, शेखर उर्फ बाब्या जांभोरे या टोळीवर सात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. निगडी मधील ढाका (बिष्णोई) टोळीचा प्रमुख सुरेश ढाका आणि त्याचे साथीदार महिपाल बिष्णोई, सुभाष बिष्णोई या टोळीवर पिंपरी-चिंचवड आणि राजस्थान, हरियाणा राज्यातील भियनल, सांचोरी, छापी, धानोरा, धोरीमन्ना, चित्तोडगड पोलीस ठाण्यांमध्ये नऊ गुन्हे दाखल आहेत. तसेच निगडी मधील टोळी प्रमुख अविनाश आवाड, त्याचे साथीदार शंतनू म्हसुडगे, साहिल शेख, युवराज उर्फ बीच्या अडागळे, सोमनाथ तुपे, निखिल उर्फ मॅड्या चव्हाण, चिराग चंडालिया, शाहनवाज उर्फ शान्या शेख, आदित्य चव्हाण, सौरभ अरगडे, प्रतीक रसाळ आणि एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. चिखली मधील नानावत टोळीचा प्रमुख अरमान नानावत त्याचा साथीदार सोनू गुडदावत यांच्या विरोधात १३ गुन्हे दाखल आहेत.
या टोळ्या स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी शहरात दहशत ( Pimpri-Chinchwad Police)निर्माण करण्याचा प्रयत्न करत होत्या. या गुन्हेगारांवर खून, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा, गंभीर दुखापत, जबरी चोरी, खंडणी मागणे, दुखापत, अंमली पदार्थाची साठवणूक, विक्री करणे, मृत्यू घडवून आणण्याची पूर्व तयारी करुन चोरी करणे, अमंली पदार्थाची तस्करी करणे, बेकायदेशिर अग्निशस्त्रे व हत्यार जवळ बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मागील आठ महिन्यात शहरातील २८ गुन्हेगारी टोळ्यांमधील १३९ आरोपींना मकोका लावण्यात आला आहे.
तिघेजण नागपूर कारागृहात स्थानबद्ध
रावेत आणि देहूरोड परिसरातील अट्टल गुन्हेगार मोनेश उर्फ मोहनीश देवेंद्र नाटेकर (२६, रावेत) याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदेशीररित्या घातक ( Pimpri-Chinchwad Police)हत्यार जवळ बाळगणे, गावठी हातभट्टीची दारु विक्री असे ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. दिघी, आळंदी परिसरातील अट्टल गुन्हेगार संतोष उर्फ पिंट्या लहू काळे (२८, कोयाळी, खेड) याच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण करून खून, दुखापत, खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे १० गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तळेगाव दाभाडे, चाकण परिसरातील अट्टल गुन्हेगार ( Pimpri-Chinchwad Police) संकेत ऊर्फ माँटी जगदीश नाणेकर (२७, नाणेकरवाडी, खेड) याच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, खंडणी मागणे, बेकायदेशिर शस्त्र बाळगणे, असे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. या तीनही गुन्हेगारांना नागपूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. मागील आठ महिन्यांत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्याच्या १८ कारवाया केल्या आहेत.
ऑगस्ट महिन्यात ४१ गुन्हेगार तडीपार


















