Team My Pune City – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्यावतीने ( Pimpri-Chinchwad Police) आयोजित विशेष उपक्रमात आज (2 ऑगस्ट) तब्बल 231 तक्रारदारांना 6 कोटी रुपयांचा मुद्देमाल परत देण्यात आला. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून निगडी येथील पोलीस मुख्यालयात हा ‘मुद्देमाल वितरण सोहळा’ पार पडला. या उपक्रमाने पोलिसांवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

या मुद्देमालामध्ये सोन्याचे दागिने, महागड्या चारचाकी वाहने, कोट्यवधींची रोख रक्कम आणि मोबाईल हँडसेट्स यांचा समावेश होता. पोलिसांनी तपासादरम्यान आरोपींकडून हा मुद्देमाल हस्तगत करून न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित तक्रारदारांना परत दिला.
मुद्देमालाचा तपशील:
33 तोळे सोन्याचे दागिने (किंमत 17 लाख)
6 मोटार वाहने (किंमत 41 लाख)
5 कोटी 15 लाख रुपये रोख रक्कम
167 मोबाईल हँडसेट्स (किंमत 30 लाख)
विशेषतः सायबर पोलीस स्टेशनच्या उल्लेखनीय कामगिरीचे या कार्यक्रमात कौतुक करण्यात आले. त्यांनी 5 कोटी 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करून तक्रारदारांना परत ( Pimpri-Chinchwad Police) केला. याशिवाय CEIR पोर्टलच्या माध्यमातून हरवलेले मोबाईल शोधून त्यांचे वितरणही करण्यात आले.
कार्यक्रमात पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांना जागरूकतेचा सल्ला दिला. “डिजिटल अरेस्ट”, “डीप फेक” यासारख्या नव्या सायबर फसवणुकीबाबत ( Pimpri-Chinchwad Police) माहिती देत त्यांनी स्पष्ट केले की, “भीती आणि अज्ञानामुळे नागरिक फसवणुकीला बळी पडतात. मात्र घाबरून न जाता पोलिसांकडे तात्काळ तक्रार द्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले, “चोरी गेलेली मालमत्ता परत मिळू शकते, हे आजच्या कार्यक्रमातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा.” नवीन फौजदारी कायद्यातील तरतुदींचा प्रभावी वापर करून हे प्रकरण जलदगतीने निकाली काढण्यात आले, असेही त्यांनी ( Pimpri-Chinchwad Police) सांगितले.
कार्यक्रमाला सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, विविध विभागांचे पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक, तसेच सुमारे 250 नागरिक उपस्थित होते. पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी सूत्रसंचालन केले तर शिवाजी पवार यांनी आभार मानले.
हा उपक्रम भविष्यातही अशाच पद्धतीने राबविण्यात यावा, अशी मागणी उपस्थित तक्रारदारांनी करत, पोलिसांच्या कार्यक्षमतेचे मनापासून कौतुक ( Pimpri-Chinchwad Police) केले.