situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad: परिवहन विभागाच्या जाचक अटींचा भुर्दंड प्रवासी वाहतूकदारांना नको – दत्तात्रय भेगडे

Updated On:

पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशन चा आंदोलनाचा इशारा

Team My Pune city-परिवहन विभागाचे अधिकारी प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांची वीएलटीडी व एसएलटीडी प्रणाली साठी अडवणूक करून वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) देत नाहीत. परिवहन विभागाच्या जाचक अटींचा भुर्दंड प्रवासी वाहतूकदारांना नको. या विभागाच्या गलथान कारभारामुळे आणि ही प्रणाली पुरविणाऱ्या ठेकेदारांच्या मनमानीमुळे सर्व प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यवसायिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. यावर गांभीर्याने विचार करून परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब निर्णय घ्यावा अन्यथा पिंपरी चिंचवड शहरातील सर्व प्रवासी वाहतूक करणारे व्यावसायिक आपली वाहने परिवहन विभाग कार्यालयात जमा करून तीव्र आंदोलन करतील असा इशारा पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे. असोसिएशनच्या वतीने मोशी येथील पिंपरी चिंचवड परिवहन विभाग कार्यालयात अधिकाऱ्यांना बुधवारी पत्र देण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे, कार्याध्यक्ष दीपक कलापुरे, उपाध्यक्ष भालचंद्र बोराटे, खजिनदार दशरथ पानमंद तसेच देवदत्त रावल, भाऊसाहेब घोमल, काळूराम गायकवाड, स्वामी गुजर, राहुल मुळे, अरुण काळे, राजेश पवार आदींसह पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी व शेकडो सभासद उपस्थित होते.

यावेळी भालचंद्र बोराटे यांनी सांगितले की, प्रवासी वाहन व्यवसायिक लाखो रुपयांचे भांडवल गुंतवणूक करून जोखीम पत्करून बारा महिने, अहोरात्र नियमितपणे प्रवाशांना सेवा सुविधा देत असतात. यातून लाखो रोजगार निर्मिती होते तसेच दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा महसूल राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होतो. राज्य परिवहन विभाग वेळोवेळी अनेक जाचक नियम व अटी या प्रवासी वाहतूकदार व्यावसायिकांवर लादत असते.

दीपक कलापुरे यांनी सांगितले की, जानेवारी २०१९ सालापासून अवजड व हलक्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व नव्या आणि जुन्या वाहनांमध्ये पॅनिक बटन कार्यान्वित असणारे व्हेहिकल लोकेशन ट्रॅकिंग डिवाइस (वीएलटीडी) आणि वाहनाच्या वेगमर्यादेवर लक्ष ठेवणारे स्पीड लिमिट डिवाइस (एस एलटीडी) बसविणे बंधनकारक केले आहे. ही अत्याधुनिक यंत्रणा वाहनामध्ये बसवल्याशिवाय त्या वाहनांना व्यवसाय परवाना व योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) दिले जात नाही. सर्व वाहतूक व्यवसायिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या ठेकेदारांकडून ही अत्याधुनिक यंत्रणा सर्व वाहनांमध्ये हजारो रुपये खर्च करून यापूर्वीच बसवली आहे. परंतु आता ते ठेकेदार या प्रणालीमध्ये आवश्यक असणाऱ्या अपडेटच्या सुविधा देत नाहीत तर अनेक ठेकेदारांनी हे व्यवसाय देखील बंद केले आहेत. यापूर्वी ज्या प्रवासी वाहनांमध्ये वेगमर्यादे वर लक्ष ठेवणारे स्पीड लिमिट डिवाइस (एसएलटीडी) बसविले आहे ते अपडेट करून दिले जात नाही. व्हीएलटीडी आणि एसएलटीडी प्रणाली बसून देणारे यापूर्वी शासन नियुक्त दीडशे ठेकेदार होते त्यांची संख्या आता फक्त ३० राहिली आहे. हे ठेकेदार या यंत्रणेसाठी आवश्यक असणारी अपडेट सुविधा देत नाहीत तर नवीन यंत्रणा बसवण्यासाठी वाहतूक व्यवसायिकांना त्रास देतात त्याचा आर्थिक भुर्दंड वाहतूक व्यवसायिकांना बसत आहे. ही यंत्रणा बसविली नाही तर योग्यता प्रमाणपत्र दिले जात नाही.

त्यामुळे हजारो वाहने अनेक दिवसांपासून व्यवसाय विना थांबून आहेत. याकडे परिवहन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा शहरातील सर्व प्रवासी वाहतूक व्यावसायिक आपली वाहने परिवहन विभागात कार्यालयात जमा करून तीव्र आंदोलन करतील असा इशारा देखील पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनच्या पत्रात देण्यात आला आहे.

Pune: माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

अमित वाव्हळ, किरण जाधव, प्रल्हाद बनकर, भीमराव माळी, प्रकाश बोराटे, योगेश जाधव, संतोष गायकवाड, रामदास वाव्हळ, नितीन चव्हाण, संदीप पाटील, इरफान पठाण, संतोष खडताळे, अनिकेत जाधव, विजय पाटील, संतोष वाव्हळ, अभिमान वाघमोडे, बंटी भालेकर, पांडुरंग वाघमोडे, महादु वैरागर, बाळासाहेब मिडगुले, सागर काकडे, संतोष राक्षे, बंटी बागल, रोहिदास म्हसे, संतोष बुट्टेपाटील, बालाजी सुरवसे, सुशांत निंबाळकर, धनराज सुपे, अनिकेत भेगडे, दादासाहेब ढगे, माऊली धनवटे, मयूर राजे, नवनाथ म्हसे, सुनील कोळपकर, विजय उमापे, रोहित बोराटे, विश्वास बुट्टे पाटील, सिद्धेश्वर झांबरे, संतोष खंडागळे हे सदस्य निवेदन देताना उपस्थित होते.

Follow Us On