Team My Pune City –पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानाची बाब(Pimpri-Chinchwad) ठरवत, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश कार्यकारिणी (कालावधी २०२५ – २०२८) मध्ये शहरातील नऊ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे शहरातील संघटनात्मक बळ अधिक दृढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे:
- पुष्कराज गोवर्धन – प्रदेश उपाध्यक्ष
- दिलीप कुलकर्णी – प्रदेश सरचिटणीस
- संजय परळीकर – प्रदेश चिटणीस
- अजित देशपांडे – प्रदेश प्रवक्ते
- अश्विन इनामदार – प्रदेश युवा अध्यक्ष
- आर.एस. कुमार – प्रदेश मार्गदर्शक
- सचिन कुलकर्णी – पिंपरी-चिंचवड जिल्हाध्यक्ष
- पवन वैद्य – प्रदेश कार्यकारिणी सदस्य
- अनुपमा कुलकर्णी – प्रदेश कार्यकारिणी सदस्य
या सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या कार्याचा अधिक व्यापक विस्तार(Pimpri-Chinchwad) करण्याचा, नव्या पिढीला संघटनेशी जोडण्याचा आणि समाजहिताचे उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे.
Ganesh Maharaj Mohite : संगीत विशारद गणेश महाराज मोहिते यांचा शिष्यांकडून सत्कार
PCMC : “बांधकाम पाडलं, तर बाळाला खाली टाकून आम्हीपण आत्महत्या करू” ; अतिक्रमण विरोधी पथकाला दाम्पत्याची धमकी
या यशस्वी नियुक्त्यांबद्दल शहरभरातून सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.