situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Municipal School : पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील श्रावणी पुढील शिक्षणासाठी निघाली जर्मनीला

Published On:
Pimpri Chinchwad Municipal School

Team My pune city – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कासारवाडी ( Pimpri Chinchwad Municipal School) येथील छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकणारी विद्यार्थिनी श्रावणी टोनगे हिची निवड जर्मनीतील प्रतिष्ठित युनायटेड वर्ल्ड कॉलेज (UWC) संस्थेच्या रॉबर्ट बॉश कॉलेजमध्ये झाली आहे. येत्या २८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात श्रावणीचा प्रवेश निश्चित झाला आहे. १०० टक्के शिष्यवृत्ती मिळवणारी ती महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी आहे.

महापालिकेच्या शाळेमध्ये दर्जेदार व शिक्षणासाठी पोषक वातावरण ( Pimpri Chinchwad Municipal School) असल्याचे श्रावणीच्या निवडीने सिद्ध झाले आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनी श्रावणी हिने महापालिकेच्या शाळेतील शिक्षक, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवले आहे. श्रावणी आता अकरावी-बारावीच्या शिक्षणासाठी जर्मनीला चालली आहे. तसेच या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात ती विज्ञान, गणित, अर्थशास्त्र यासारख्या विषयांचा सविस्तर अभ्यास करणार आहे.

Golden Rotary : गोल्डन रोटरीच्या तिरंगा रॅली उत्स्फूर्त प्रतिसाद

जर्मनीतील प्रतिष्ठित युनायटेड वर्ल्ड कॉलेज (UWC) संस्थेच्या रॉबर्ट बॉश कॉलेजेस या संस्थेमार्फत शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्रातून तिची निवड करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेत तिला ९३ टक्के गुण मिळाले आहेत. तिचे वडील खासगी शाळेत शिक्षक आहेत, तर आईदेखील खासगी कंपनीत नोकरी करत आहे.

२८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात( Pimpri Chinchwad Municipal School) श्रावणीचा शिक्षणप्रवास जर्मनी येथून सुरू होणार आहे. युनायटेड वर्ल्ड कॉलेजेस या संस्थेची जगभरात विविध ठिकाणी शाळा व महाविद्यालये आहेत. संस्थेमार्फत शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्त्या दिल्या जातात. श्रावणीने अनेक शैक्षणिक व सहशालेय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तिने शिष्यवृत्ती परीक्षा तसेच हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा देखील यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. तसेच, क्रीडा क्षेत्रातही शाळेच्या बास्केटबॉल संघाची कर्णधार देखील होती आणि डिस्कस थ्रो या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक मिळवले होते.

Pimpri Chinchwad Crime News 13 August 2025 : बँकेत बनावट नोटा जमा करण्याचा प्रयत्न

शिष्यवृत्तीसाठी विविध टप्प्यांवर परीक्षा, चर्चा, मुलाखत ( Pimpri Chinchwad Municipal School) आणि उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. श्रावणीच्या नेतृत्वगुणांना, सामाजिक जाणिवेला आणि शैक्षणिक समतेला या निवड प्रक्रियेत प्राधान्य दिले गेले.

श्रावणीची निवड झाल्यामुळे हे संपूर्ण शहरासाठी आणि महापालिकेच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी गौरवाचा क्षण आहे. श्रावणीने आपली गुणवत्ता, जिद्द आणि प्रयत्नांच्या( Pimpri Chinchwad Municipal School) जोरावर हे यश मिळवले आहे. केंद्रित शिक्षणपद्धती आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा मोठा वाटा तिच्या यशात आहे. ‘विद्यार्थी गुणवत्तावाढ उपक्रम’, विशेष मार्गदर्शन सत्रे आणि शाळेतील प्रोत्साहनात्मक वातावरण यामुळेच श्रावणीला आंतरराष्ट्रीय संधी मिळवता आली आहे.
……..

पिंपरी चिंचवड महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जागतिक पातळीवर यश मिळवण्याची क्षमता आहे, हे श्रावणीने दाखवून दिले आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात आम्ही गुणवत्ता, संधी आणि समावेश यांना नेहमीच प्राधान्य दिले आहे. श्रावणीच्या यशामुळे आमचे शिक्षण धोरण अधिक बळकट झाले आहे. तिचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल.
— शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका ( Pimpri Chinchwad Municipal School)

…..

श्रावणीच्या यशामध्ये शाळेच्या शिक्षकांचे मार्गदर्शन, कुटुंबीयांचे पाठबळ आणि महापालिकेच्या शैक्षणिक उपक्रमांचे मोलाचे योगदान आहे. श्रावणीने मिळवलेली आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती ही केवळ तिच्या कष्टांचीच नव्हे, तर महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचीही पोचपावती आहे. ही प्रेरणादायी वाटचाल इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरणार आहे.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका ( Pimpri Chinchwad Municipal School)

….

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, आत्मविश्वास आणि जागतिक स्तरावर चमकण्याची क्षमता आहे, हे श्रावणीने सिद्ध करून दाखवले आहे. महापालिका शाळांमधून घडणारे हे उज्ज्वल भविष्य म्हणजेच आपल्या शिक्षण विभागाचे यश आहे. अशा विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे, संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी महापालिका सदैव कटिबद्ध आहे.
– किरणकुमार मोरे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका ( Pimpri Chinchwad Municipal School)

……

मला महापालिकेच्या शाळेत केवळ शिक्षणच नाही, तर स्वप्न बघण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली. माझ्या यशामध्ये शिक्षकांचे सततचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि शाळेच्या वातावरणाचा मोठा वाटा आहे. युनायटेड वर्ल्ड कॉलेजमध्ये शिकण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी आयुष्य बदलणारं आहे. मी हे यश माझ्या सर्व शिक्षकांना, कुटुंबाला आणि महापालिकेच्या शिक्षण विभागाला समर्पित करते.
– श्रावणी टोनगे, विद्यार्थिनी ( Pimpri Chinchwad Municipal School)

Follow Us On