Team My Pune City – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत(Pimpri Chinchwad) महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली. सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) आणि एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे.
वासोली परिसरातील एका व्यावसायिकाला महिन्याला १० हजार रुपयांची खंडणी मागत अपहरण करून मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात नारायण घावटे, ऋषिकेश रोकडे, रोशन गोगावले, अनिल शिंदे आणि गणेश लिंभोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या टोळीवर ६ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यातील नारायण, ऋषिकेश, अनिल आणि गणेश हे आरोपी अटक असून ते सध्या येरवडा कारागृहात आहेत.
Bhosari: प्रवीण गायकवाड यांना ” द थेम्स इंटरनॅशनल विद्यापीठाकडून” पीएचडी पदवी प्रदान
Lonavala: बस प्रवासादरम्यान महिलेचे सहा लाखाचे दागिने चोरीला
याशिवाय सराईत गुन्हेगार रामदास हानपुडे याच्यावर सहा गुन्हे दाखल असून त्याला छत्रपती संभाजीनगर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. आरोपी प्रल्हाद बच्चे याच्यावर चार गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याला अमरावती मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.