Team MyPuneCity –महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (१३ मे) ऑनलाईन माध्यमातून जाहीर करण्यात आला. दहावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवड शहरात मुलांपेक्षा मुली अव्वल ठरल्या. मुलांचा निकाल ९७.५५ टक्के तर मुलींचा निकाल ९८.४३ टक्के लागला आहे. शहरातील २१३ शाळांपैकी १२३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. शहराचा एकूण निकाल ९७.९७ टक्के लागला आहे.
Alandi : फुटपाथ पादचाऱ्यांसाठी की विक्रेत्यांसाठी ? आळंदीकरांचा सवाल
दहावीच्या परीक्षेसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील २१३ शाळांमधून १० हजार ३३२ मुले तर ९ हजार ५८५ मुली अशी १९ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १० हजार २९६ मुले आणि ९ हजार ६७२ मुली अशा १९ हजार ८६८ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यातील १० हजार ४४ मुले तर ९ हजार ४२२ मुली असे एकूण १९ हजार ४६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ४०२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
Talegaon News : शरदराव जोशी यांच्या ६ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘स्वर स्मृती’द्वारे सांगितिक आदरांजली
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ८ हजार ३८३ विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन मिळाले आहे. तर प्रथम श्रेणी ६ हजार ६८५, द्वितीय श्रेणी ३ हजार ५८७ आणि पास श्रेणी ८१० विद्यार्थ्यांना मिळाली आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन माध्यमातून निकाल लागला. विद्यार्थ्यांनी निकाल लागल्यानंतर आनंद व्यक्त केला.