situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवड शहरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप

Published On:

एक लाख ११ हजार मुर्त्या, २१५ टन निर्माल्य संकलन

दहा तास चालली विसर्जन मिरवणूक

Team My Pune City –पिंपरी-चिंचवड शहरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात (Pimpri-Chinchwad)आला. शनिवारी (६ सप्टेंबर) शहरातील सर्व गणपतींचे विसर्जन झाले. मनपा मार्फत शहरातील ४५ घाटांवर तसेच काही ठिकाणी खासगी विसर्जन हौदांमध्ये गणपती विसर्जनाची सोय करण्यात आली होती. नदी प्रदूषण टाळण्यासाठी नदीमध्ये एकही मूर्ती विसर्जित करण्यात आली नाही. कृत्रिम हौदांमध्ये विसर्जन केल्यानंतर मुर्त्यांचे संकलन करण्यात आले. शहरातील सर्व घाटांवर एकूण एक लाख ११ हजार पेक्षा अधिक गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. तसेच २१५.७० टन निर्माल्य जमा करण्यात आले. शनिवारी पिंपरी आणि चिंचवड येथून मिरवणूक काढत सार्वजनिक मंडळांनी बाप्पाला निरोप दिला. दुपारी दोन वाजता सुरु झालेल्या मिरवणुका रात्री १२ वाजेपर्यंत चालल्या.

शहरात पिंपरी आणि चिंचवड येथे मिरवणुकीचे मुख्य मार्ग आहेत. या मार्गांवर मनपा, पोलिसांच्या स्वागत कमान उभारण्यात आल्या. पिंपरी व चिंचवड शहरात निघालेल्या मुख्य विसर्जन मिरवणुकीमध्ये राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, वीर मुरारबाजी अशा ऐतिहासिक देखावे काही मंडळांनी सादर केले. या देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पिंपरी येथील गणेश विसर्जन मिरवणुकीतील भक्तीशक्तीचा संदेश देणारा तसेच चिंचवड येथील मिरवणुकीतील माय मराठीचा गंध हा मराठी भाषेचा सन्मान करणारा विसर्जन रथ देखील गणेशभक्तांचे आकर्षण ठरले. पारंपरिक वेशभुषेत कलाकारांनी सादर केलेला ढोल-ताशांचा गजर,रांगोळी आणि फुलांची उधळण अशा उत्साहपूर्ण वातावरणात पिंपरी चिंचवड येथे गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली.

या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या मंडळांचे पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने स्वागत करण्यात आले. कराची चौक पिंपरी येथे दुपारी २.१५ वाजता शिवशंकर मित्र मंडळ हे पहिले मंडळ पोहोचले. तर अखेरचे भागवत मित्र मंडळ रात्री ११.४५ वाजता पोहोचले. या ठिकाणी एकूण २९ मंडळांनी सत्कार स्वीकारले. हुतात्मा चापेकर चौकातील स्वागत कक्षातून एकूण ३१ गणेश मंडळांनी सत्कार स्वीकारला. या कक्षामध्ये सर्वात प्रथम अजिंक्य मित्र मंडळ सायंकाळी ५.१० वाजता दाखल झाले, तर अखेरचे मोरया गोसावी क्रीडांगण मित्र मंडळ रात्री ११.५५ वाजता दाखल झाले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध कलापथकांनी सादर केलेले ढोल ताशांचे चित्तथरारक पारंपरिक खेळ, विद्युत रोषणाईने सजविलेले रथ आणि सांस्कृतिक सादरीकरणातून केलेली आरास नागरिकांना मंत्रमुग्ध करत होती.

Nana Peth Crime News : कोमकरचा खून प्रकरणी बंडू आंदेकरसह अकरा जणांवर गुन्हा

Jambhavede: गणेशोत्सवात महिलांसाठी खास आकर्षण – “खेळ रंगला पैठणीचा”!

मनपाच्या ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतून सर्वाधिक ४८.७७ टन निर्माल्य जमा करण्यात आले. एकूण २१५.७० टन निर्माल्य जमा झाले. ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतच सर्वाधिक ३९ हजार ९३९ मुर्त्यांचेही संकलन झाले. शहरात एकूण एक लाख ११ हजार ७२९ मुर्त्यांचे संकलन करण्यात आले. त्यामध्ये २० हजार ७२८ पर्यावरणपूरक तर ९१ हजार २ मुर्त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या होत्या.

चिंचवड येथील चाफेकर चौकात स्वागत करण्यात आलेली मंडळे

अजिंक्य मित्र मंडळ, श्री दत्त तरुण मंडळ, श्री गणेश मंडळ चिंचवड स्टेशन, सद्गुरु मंडळ चिंचवड गाव, श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ गांधी पेठ चिंचवड, ज्ञानदीप मित्र मंडळ गांधी पेठ चिंचवड, क्रांतिवीर भगतसिंग मित्र मंडळ राम आळी चिंचवड, उत्कृष्ट मित्र मंडळ भोई आळी चिंचवड, मिल्कमेड परिवार चिंचवड स्टेशन, आदर्श मित्र मंडळ तानाजी नगर चिंचवड, नव गजानन मित्र मंडळ चिंचवड, गांधी पेठ मित्र मंडळ चिंचवड गाव, मुंजोबा मित्र मंडळ चिंचवड, गावडे कॉलनी संस्कृती मित्र मंडळ चिंचवड स्टेशन, श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, उत्कर्ष मित्र मंडळ माणिक कॉलनी चिंचवड, मोरया मित्र मंडळ गावडे भोईर आळी चिंचवड, भोईर कॉलनी मित्र मंडळ गावडे कॉलनी चिंचवड, समर्थ मित्र मंडळ दळवी नगर, नवतरुण मित्र मंडळ चाफेकर चौक, नवभारत मित्र मंडळ गावडे भोईर आळी, संतोष नगर मित्र मंडळ चिंचवड स्टेशन, शिवाजी उदय मित्र मंडळ तानाजी नगर, गावडे पार्क मित्र मंडळ चिंचवड स्टेशन, अष्टविनायक मित्र मंडळ, श्री काळभैरवनाथ मित्र मंडळ चिंचवड, समता तरुण मंडळ दळवीनगर, सुदर्शन मित्र मंडळ चिंचवड स्टेशन, मयुरेश्वर मित्र मंडळ मंगलमूर्ती वाडा, मोरया गोसावी क्रीडांगण केशवनगर.

पिंपरी येथील कराची चौकात स्वागत करण्यात आलेली मंडळे

शिवशंकर मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ, हर्षल मित्र मंडळ, श्री नवचैतन्य तरुण मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, फुले मार्केटचा राजा, महेश मित्र मंडळ, लालबहादूर शास्त्री मित्र मंडळ, स्वराज्य मित्र मंडळ, श्री महादेव मित्र मंडळ, एस पी मित्र मंडळ, जय भारत तरुण मंडळ, साईबाबा मित्र मंडळ, रमाबाई नगर मित्र मंडळ, १६ नंबर वाई मित्र मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ, मोरया मित्र मंडळ, श्री साई तरुण मित्र मंडळ, न्यू स्टार मित्र मंडळ, गजानन मित्र मंडळ, दिग्विजय मित्र मंडळ, भागवत तरुण मंडळ.

क्षेत्रीय कार्यालयानुसार संकलित निर्माल्य

  • अ क्षेत्रीय कार्यालय – १८.८१ टन
  • ब क्षेत्रीय कार्यालय – ४८.७७ टन
  • क क्षेत्रीय कार्यालय – २६.४६ टन
  • ड क्षेत्रीय कार्यालय – २७.४३ टन
  • इ क्षेत्रीय कार्यालय – ३२.१६ टन
  • ग क्षेत्रीय कार्यालय – १६.२३ टन
  • फ क्षेत्रीय कार्यालय – २५.५२ टन
  • ह क्षेत्रीय कार्यालय – २०.३० टन

मूर्ती संकलन प्रभागनिहाय आकडेवारी

मूर्ती संकलन आकडेवारी

अ प्रभाग : ६,५९१
ब प्रभाग : ३९,९३९
क प्रभाग : १९,८५९
ड प्रभाग : ८,१७१
ई प्रभाग : ६,४४६
फ प्रभाग : १७,४९०
ग प्रभाग : ७,१७५
ह प्रभाग : ६,०६२

Follow Us On