situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri-Chinchwad Cyber ​​Police : डिजिटल अरेस्ट केल्याचे भासवून ५२ लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

Published On:
Pimpri-Chinchwad Cyber ​​Police

पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची कामगिरी

Team MyPuneCity – डिजिटल अरेस्ट केल्याचे भासवून मोशी येथील एका व्यक्तीला बँक खात्यातील सर्व रक्कम एका अनोळखी बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यामध्ये व्यक्तीची ५२ लाख ५९ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अवघ्या काही तासात दोन आरोपींना अटक ( Pimpri-Chinchwad Cyber ​​Police) केली आहे.

आकाश बाबासाहेब पठारे (२८), अविनाश तुंगार (रा. बोल्हेगाव आहिल्यानगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मोशी येथील एका व्यक्तीला एक अनोळखी मोबाईल नंबरवरुन फोन आला. फोनवरील व्यक्तीने त्यांना मुंबई क्राईम ब्रांचचे संताजी घोरपडे, फायनान्स डिपार्टमेंटचे हेड जॉर्ज मॅथ्यु असल्याचे सांगितले. तसेच त्यांना व्हॉट्सअप व्हीडीओ कॉल करुन फिर्यादीचे नावे असलेले बँक एस.बी.आय व एचडीएफसी बँक अकाऊंट यावर जमा असलेली रक्कम ही मनी लाँड्रीगची असल्याचे सांगून त्यावर मनी लॉन्ड्रींगची केस झाल्याचे सांगितले. त्यामध्ये एक पथक अटक करण्यासाठी निघाले असल्याची भीती दाखवण्यात आली. सदर रक्कम आर.बी.आय फायनन्स कडून पडताळणी करण्याच्या बहाण्याने मनी लॉड्रींग व त्यामध्ये अटकेची भिती घालुन फिर्यादी यांना वेगेवेगळ्या बैंक खात्यामध्ये एकुण ५२ लाख ५९ हजार रुपये पाठविण्यास भाग पाडत फिर्यादी यांची फसवणूक केली. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Maval: हॉस्पिटल मध्ये गेलेल्या आजीची नातवंडे झाली बेपत्ता

या गुन्ह्यात पोलिसांच्या नावाचा वापर केल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आरोपींचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार सायबर पोलिसांनी दोन पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषण केले असता फिर्यादी यांनी पाठवलेल्या पैशांमधून पाच लाख ३९ हजार ८४० रुपये अहिल्यानगर येथील एका व्यक्तीच्या खात्यावर गेल्याचे आढळले. पोलिसांनी अहिल्यानगर येथे जाऊन आकाश पठारे याला अटक केली. त्याने त्याचे साथीदार अविनाश तुंगार, शुभम उर्फ विकी देठे व कृष्णा उर्फ जितु भगत यांच्या सोबत मिळून केला असल्याचे सांगितले. आकाश याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळताच इतर आरोपींनी मोबाईल बंद केला आणि पलायन ( Pimpri-Chinchwad Cyber ​​Police) केले. अविनाश तुंगार हा गाव सोडून पळून जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशीकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप आयुक्त संदिप डोईफोडे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार अतुल लोखंडे, हेमंत खरात, दिपक भोसले, नितेश बिच्चेवार, स्वप्निल खणसे, महेश मोटकर, ज्योती साळे, वैशाली बर्गे यांनी केली.

काय असते डिजीटल अरेस्ट

व्यक्तींना एखादया अनोळखी नंबरवरुन पोलीस, न्यायाधिश, सीबीआय, ऑडीटर, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडीया, फायनान्स डिपार्टमेंट हेड व सेक्रेटरी ऑफ मिनीस्ट्री अशा वेगवेगळया नावांनी संपर्क करुन त्यांच्या नावाने मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल असल्याचे सांगून त्यांना भिती घातली जाते. तसेच आरोपी हे व्यक्तींना व्हिडीओ कॉलव्दारे देखील संबधीत व्यक्ती हे तेच असल्याचे दाखवले जाते. त्यामुळे व्यक्तींना त्यांच्यावर विश्वास बसते. त्यानंतर आरोपी हे व्यक्तींना त्यांच्या अकाऊंटवर असलेले सर्व पैसे त्यांनी दिलेल्या अकाऊंटवर ट्रान्सपर करण्यासाठी सांगून फसवणूक ( Pimpri-Chinchwad Cyber ​​Police) केली जाते.

न्यायाधिश, सीबीआय, ऑडीटर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडीया, फायनान्स डिपार्टमेंट हेड, व सेक्रेटरी ऑफ मिनीस्ट्री अशा वेगवेगळ्या नावांनी संपर्क करुन मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल असल्याचे सांगून पैसे ट्रान्सपर करण्यास सांगत असतील तर जवळच्या सायबर पोलीस ठाणे अथवा cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन तक्रार दया किंवा १९३० या टोल फ्रि नबरवर तक्रार दयावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले ( Pimpri-Chinchwad Cyber ​​Police) आहे.

Follow Us On