Team My pune city –सायबर पोलीस स्टेशन,(Pimpri Chinchwad) पिंपरी चिंचवड पोलिसांनी ५७ लाखांहून अधिक रुपयांच्या सायबर फसवणुक प्रकरणी पैसे रोख स्वरूपात काढून क्रिप्टोकरन्सीत रुपांतर करणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे.
फिर्यादी यांना युट्यूबवरील गुंतवणूक व्हिडिओद्वारे Abbott wealth अॅप वर ५७ लाख ७० हजार ६७० रुपये गुंतवण्यास प्रवृत्त करण्यात आले. सुरुवातीला ५.१५ कोटींचा नफा दाखवून नंतर पैसे काढताना विविध चार्जेस मागण्यात आले. संशय आल्यावर फिर्यादींनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तपासात या रकमेपैकी काही भाग बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातून काढण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले. हे खाते मारुफ रिअल इस्टेट नावाने उघडण्यात आले होते. पोलिसांनी तपास करून साहिल अनवर सय्यद (वय २२), भुपेंद्र अवतार सिंग (वय ३४), सर्फराज रफीक सय्यद (वय २९, तिघेही रा. कोंढवा, पुणे) यांना अटक करण्यात आली. त्यांनी रोख रक्कम घेऊन USDT क्रिप्टोकरन्सीत रुपांतर केल्याचे स्पष्ट झाले.
Dahi handi : सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांनी आपची दही हंडी साजरी
Talegaon Dabhade News : निवडणूक प्रक्रियेला गती; तळेगाव दाभाडे प्रभाग रचना मंजूर
यापूर्वी या प्रकरणात चित्रपट निर्माता शिवम बाळकृष्ण संवत्सरकार याला अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे करत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.





















