situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri – Chinchwad Crime News 31 May 2025 : चिखलीत शिवीगाळी व घरात घुसून मारहाण; तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – भांडणाच्या जुन्या वादातून तीन जणांनी एका महिलेला व तिच्या मुलाला घरात घुसून शिवीगाळी करत हातातील काठीने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना मोरेवस्ती, चिखली येथे घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, २९ मे २०२५ रोजी रात्री ९ वाजता तिच्या राहत्या घरी सुबाम गजानन राऊत (वय ४५), शुभम सुदाम राऊत (वय २२, दोघे रा. शिवशंकर हौसिंग सोसायटी नंबर १, मोरेवस्ती, चिखली) व सौरख मस्के (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) या आरोपींनी जबरदस्तीने प्रवेश करून शिवीगाळ केली. त्यानंतर शुभम राऊत याने हातातील काठीने फिर्यादीचा मुलगा विभीषण अंबादास नांद याच्या डोक्यावर जोरात मारून गंभीर जखमी केले. यावेळी सौरख मस्के याने देखील हाताने मारहाण करत दमदाटी केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबर करीत आहेत.

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड ते राजगुरुनगरदरम्यान दररोजचा प्रवास ठरत आहे मानसिक छळ


आळंदी रोडवर रस्ता अडवून मारहाण; दोन जणांविरुद्ध गुन्हा

चिंबळी-आळंदी रोडवरील आसाराम बापू आश्रमासमोर दुचाकीवरून घरी परतणाऱ्या युवकाला दोन अनोळखी व्यक्तींनी रस्ता अडवून डोक्यात दगड घालून गंभीर दुखापत केली. तसेच शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी गंगाधर नीळे (वय ३६, रा. पवार टेलर, नीळे गल्ली, मरकळ रोड, आळंदी) हे त्यांचा मित्र अभिषेक जाधव याच्यासह दुचाकीवरून घरी जात असताना ही घटना घडली. आरोपी प्रदीप सुनील पाटील (वय ३२, रा. सैलानी, पिंपळगाव, ता. चिखली, जि. बुलढाणा) व त्याचा साथीदार सुनील शिंदे यांनी गंगाधर यांच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याची धमकी दिली. तपास सहायक पोलीस फौजदार कोतवाल करीत आहेत.


वाकडमध्ये किरकोळ वादातून तरुणावर सिमेंटचा गड्डू फेकून हल्ला

मोबाईल घेतल्याच्या वादातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर सिमेंटचा गड्डू फेकून गंभीर दुखापत केल्याचा प्रकार वाकड येथील काळाखडक झोपडपट्टीत घडला. वाकड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अजय अमोल कानेकर (वय २०, रा. पाण्याच्या टाकीजवळ, काळाबडक झोपडपट्टी, वाकड, पुणे) व त्याचा मेव्हणा ऋषिकेश जाधव काळाखडक झोपडपट्टी येथे बसले होते. यावेळी स्वराज (चैतन्य) विशाल माळवे (वय १९, अंदाजे, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड, पुणे) याने मोबाईलचा वादातून फिर्यादीच्या तोंडावर सिमेंट गड्डू फेकून गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने करीत आहेत.


कार फसवणूक प्रकरण; दोघांविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा

ओळखीचा गैरफायदा घेत महिला व तिच्या साथीदाराने आजारपणाचे कारण सांगून ४ लाख रुपये किमतीची कार विश्वासाने ताब्यात घेऊन परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार चिंचवड येथील संजीवनी आईस्क्रिम दुकानाजवळ घडला. सर्जेराव बिरा इवळे (वय ३९, रा. गणेशविश्व फेज-२, भिंताडेनगर, आंबेगाव पठार, कात्रज) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

२३ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता वाल्हेकरवाडी येथील चिंतामणी चौकात आरोपी सचिन रमेश खिंवसरा व एक महिला (दोघे रा. मारुंजी, हिंजवडी) यांनी फिर्यादीची एमएच १४ जीएन ७८२८ क्रमांकाची चारचाकी कार विश्वास संपादन करून ताब्यात घेतली. कार परत न दिल्यामुळे फिर्यादीची फसवणूक झाली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक झिंजुर्डे करत आहेत.


चाकणमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

भरधाव वेगात ट्रक चालवून निष्काळजीपणाने वाहन हाकल्यामुळे ट्रकने दुचाकीस्वारास जोराची धडक दिल्याचा प्रकार विरदवडी गावाजवळ घडला. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी गणेश बसदेव मायकर (वय ३०, धंदा – ड्रायव्हर, रा. साळीबा, ता. वडवणी, जि. बीड) हे त्यांच्या वाहनासोबत विरदवडी गावाजवळील आंबेडान ते चावण रस्त्यावर होते. त्यावेळी योगेश विष्णु कड (वय ३५, रा. कड वस्ती, किवळे, ता. मावळ, जि. पुणे) याने ट्रक भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून त्यांच्या वाहनास धडक दिली. या अपघातात मायकर गंभीर जखमी झाले. तपास पोलीस उपनिरीक्षक माने करीत आहेत.

चिंचवड येथे दोन गावठी पिस्तुल व काडतूससह तरुण अटक

बेकायदेशीररित्या दोन गावठी बनावटीची पिस्तुले व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी रामनगर, चिंचवड परिसरात केली.

प्रिन्सकुमार मुझा सिंह (वय २२ वर्षे, रा. राजीव गांधी नगर, मेट्रो मेडिकल, अप्पर रोड, विवेकवाडी, पुणे; मूळ गाव – पुरानी मठिया, पसमोली, महराजगंज, सियान, विहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

ही घटना १० मे २०२५ रोजी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास राष्ट्रमाता जिजाऊ सांस्कृतिक भवनाजवळील मोकळ्या मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. पोलिस कर्मचारी रोहित रघुनाथ गापमारे (पो.शि. २३५५) यांनी आरोपीकडे तपासणीदरम्यान ५०,५०० रुपये किमतीची दोन गावठी पिस्तुले व एक जिवंत काडतूस बाळगलेले आढळून आले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अटकेत असून पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

रावेत येथे भरधाव ओमिओ कारच्या धडकेत कामगार जखमी

पुणे-बेंगळुरू हायवेवर श्रीकृष्णा फूड कोर्टजवळ भरधाव वेगात आलेल्या ओमिओ कारने मोटारसायकलला धडक दिल्याने कामगार गंभीर जखमी झाला. आरोपी महिला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी समीर विठ्ठल मोरे (वय २१, रा. अंकुश चौक, निगडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. ४ मे २०२५ रोजी संध्याकाळी ६.४५ वाजता ही दुर्घटना घडली. फिर्यादीचे वडील विठ्ठल जगन्नाथ मोरे (वय ५३ वर्षे, व्यवसाय – मजुरी) हे सुझुकी अ‍ॅक्सेस क्रमांक MH14 DV 4064 वरून हिंजवडी ते निगडी जात असताना श्रीकृष्णा फूड कोर्ट जवळ सेवा रस्त्यावर ओमिओ कार क्रमांक MH14 HW 1592 चालवणाऱ्या महिला चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगात वाहन चालवत त्यांना जोरदार धडक दिली.

या धडकेत विठ्ठल मोरे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून डाव्या बाजूच्या बरगड्यांवर मुक्कामार लागून ते गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी संबंधित महिला चालकाविरुद्ध रावेत पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) व मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस फौजदार सोनवणे करत आहेत.

Follow Us On