situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 31 August 2025: हप्ता देण्याची मागणी करत पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण, तिघांना अटक

Published On:

Team My Pune City -चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेदनकरवाडी येथे पुणे-नाशिक हायवेवर असलेल्या भारत पेट्रोल पंपावर तिघांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण करून हप्त्याची मागणी केली. ही घटना शनिवारी (३० ऑगस्ट) रात्री घडली.

अतुल अर्जुन तांबे (१९, खंडोबा माळ, चाकण), सोहम श्रीकांत माने (१८, वराळे), ओंकार सुरेश बागल (२०, देहूगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सचिन शिवाजी बिरादार (३०, मेदनकरवाडी) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Gauri Avahan: गौरी आवाहन स्थापनेसाठी रविवार, ३१ ऑगस्ट रोजी ‘हे’ आहेत विशेष शुभमुहूर्त


Chakan: इंस्टाग्रामवरील ओळखीनंतर घरात शिरून विवाहितेवर बलात्कार;पोलिसावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पेट्रोल पंपावर काम (Pimpri Chinchwad Crime News 31 August 2025)करत असताना आरोपींनी त्यांच्याकडून ९० रुपयांचे पेट्रोल फुकटात भरून घेतले. त्यानंतर, ‘इथे पेट्रोल पंप चालवायचा असल्यास आम्हाला ५,००० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर पेट्रोल फुकटात भरावे लागेल’, असे म्हणत त्यांनी पैशाची मागणी केली. फिर्यादीने विरोध केल्यावर आरोपींनी त्यांना मारहाण केली आणि त्यांचे सहकारी भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण केली. आरोपींनी ‘आम्ही इथले भाई आहोत, इथे पंप चालवायचे असल्यास आम्हांला हप्ता द्यावा लागेल,’ असे मोठ्याने ओरडून पंपावर भीतीचे वातावरण निर्माण केले. पेट्रोल पंपावर इंधन भरायला आलेले वाहनचालक घाबरून पळून गेले. चाकण पोलीस तपास करत आहेत.


गुंतवणुकीच्या नावाखाली १.२६ कोटींची फसवणूक

एसपीव्हीएस ग्रुप ऑफ कंपनीच्या दोन डायरेक्टर (Pimpri Chinchwad Crime News 31 August 2025)आणि पार्टनर्सनी लोकांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी २६ लाख ७५ हजार ४८३ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना मार्च २०२३ ते ३० ऑगस्ट या कालावधीत निगडी येथील भेळ चौक परिसरात घडली.

या प्रकरणी ४९ वर्षीय व्यक्तीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विकास दादा निकम (कोपर खैरणे, नवी मुंबई) आणि सचिन बाबासाहेब डोंगरे (कलकी, ता. फलटण, जि. सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कट रचून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला काही रक्कम परतावा म्हणून देऊन त्यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, फिर्यादीने गुंतवलेले ६० लाख ७५ हजार ४८३ रुपये आणि त्यांच्या नातेवाईक व मित्रांनी गुंतवलेले ६६ लाख रुपये, अशी एकूण १ कोटी २६ लाख ७५ हजार ४८३ रुपये त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरून परत न करता फसवणूक केली आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.


दोन वाहनांच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

रस्त्याने पायी जाणाऱ्या एका व्यक्तीला दोन वेगवेगळ्या वाहनांनी धडक दिली. या अपघातात पादचारी व्यक्ती गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी (२९ ऑगस्ट) रात्रीच्या वेळी चाकण नगर परिषदेच्या हद्दीत वाघे वस्ती येथील पुलावर घडली.

या प्रकरणी राजू पोपट परदेशी (४६, वाघे वस्ती, चाकण) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन वाहन चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजू परदेशी हे सर्व्हिस रोडने पायी चालत जात होते. आंबेठाण चौकाकडून आलेल्या इको व्हॅनने त्यांना जोरदार धडक दिली. त्यानंतर, त्या व्हॅनच्या पाठीमागून आलेल्या स्विफ्ट कारने देखील त्यांना धडक दिली. या अपघातात फिर्यादीच्या उजव्या पायाच्या मांडीचे हाड फॅक्चर झाले असून, डाव्या पायालाही गुडघ्यापासून घोट्यापर्यंत गंभीर दुखापत झाली आहे. तसेच, त्यांच्या डाव्या हाताच्या पंजाची बोटेही तुटली आहेत आणि हाताला ओरखडेही आले आहेत. चाकण पोलीस तपास करत आहेत.


वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला स्कॉर्पिओने उडवले

चाकण येथे वाहतूक नियमन करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला स्कॉर्पिओ चालकाने धडक देऊन पळ काढला. वाहनावर पेंडिंग असलेला दंड भरण्यास सांगितल्याने चालकाने वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करून धमकी दिली. ही घटना शनिवारी (३० ऑगस्ट) दुपारी आळंदी ते चाकण रोडवरील सिग्नलजवळ घडली.

देवयानी सोनवणे असे जखमी पोलीस महिलेचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्कॉर्पिओ गाडी (एमएच १४/डीए ५२५२) वरील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या सहकाऱ्यासोबत मेदनकरवाडी गावच्या हद्दीत वाहतूक नियमन करत होत्या. त्यावेळी सिग्नलवर थांबलेल्या एका स्कॉर्पिओ गाडीला त्यांनी तपासले असता, त्या गाडीवर ६२ हजार रुपयांचा दंड थकीत असल्याचे दिसून आले. फिर्यादीने चालकाला लायसेन्स विचारल्यावर त्याने अरेरावीची भाषा करत ‘माझ्याकडे लायसेन्स नाही, काय करायचे ते करा’ असे म्हटले. फिर्यादीने गाडी बाजूला घ्यायला सांगितल्यावर दंडापासून वाचण्यासाठी त्याने शिवीगाळ केली आणि उलट गाडी पुढे घेतली. गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादीच्या डाव्या हाताच्या बोटाला खरचटले आणि उजव्या हाताला धक्का बसला. आरोपीने सरकारी कामात अडथळा निर्माण करून पळ काढला. चाकण पोलीस तपास करत आहेत.


भाईगिरी करत तरुणाला दगडाने मारहाण

आम्ही इथले भाई आहोत असे म्हणत तीन आरोपींनी एका तरुणाला दगडाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (२८ ऑगस्ट) दुपारी मोरेवस्ती, चिखली येथील शिव मंदिराच्या जवळ घडली.

या प्रकरणी अनुराग विशाल चौहान (१९, मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हरीष त्रिपाठी (१९, मोरेवस्ती, चिखली), एक अल्पवयीन मुलगा आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिव मंदिराच्या कट्ट्यावर बसून दुधवाल्याला ऑनलाइन पैसे देत असताना आरोपी मोटारसायकलवरून आले. ‘तू इथे बसायचे नाही, तू इथून निघून जा, आम्ही इथले भाई आहोत, तू आमचे ऐकले पाहिजे’, असे आरोपींनी म्हटले. फिर्यादीने ऑनलाइन पेमेंट झाल्यावर लगेच जातो असे सांगितले असता, आरोपी हरीष त्रिपाठीने ‘तुला जा म्हटले तरी तू जात नाहीस, थांब तुला जिवंत सोडत नाही’ असे म्हणत शिवीगाळ केली. आरोपी हरीष आणि १७ वर्षीय मुलाने मंदिराच्या जवळ पडलेले दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यावर आणि पाठीवर मारले. यात अनुराग हे गंभीर जखमी झाले. अनोळखी आरोपीनेही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. भांडण ऐकून जमलेल्या लोकांना ‘आम्ही इथले भाई आहोत, तुम्ही कोणीही मध्ये पडायचे नाही, नाहीतर आम्ही तुम्हाला पण मारून टाकू’ अशी धमकी देऊन आरोपींनी दहशत निर्माण केली. चिखली पोलीस तपास करत आहेत.

Follow Us On