situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 30 June 2025 : बांधकाम साइटवरून बांधकाम साहित्याची चोरी

Published On:
Pimpri Chinchwad Crime News 30 June 2025

Team MyPuneCity – केळगाव येथे बांधकाम साइटवरून 2.20 लाख रुपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (27 जून) सकाळी उघडकीस (Pimpri Chinchwad Crime News 30 June 2025) आली.

किरण महादेव गिरी (38), संदीप शिवाजी काळजे (34), दीपक टेक राणा (33), जान मोहम्मद रेफाकत अली सिद्दिकी (40) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी संदीप भानुदास गावडे (35, मोशी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केळगाव येथे श्रीशा आयकॉन ही बांधकाम साईट सुरू आहे. तिथे गावडे यांनी बांधकाम साहित्य ठेवले आहे. त्यातून 2.20 लाख रुपये किमतीचे बांधकाम साहित्य आरोपींनी चोरून नेले.


घरकाम करणाऱ्या महिलेने चोरले 60 हजारांचे दागिने (Pimpri Chinchwad Crime News 30 June 2025)

घरकाम करणाऱ्या महिलेने घरातून 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 15 जून रोजी रात्री आकुर्डी येथील ऐश्वर्यम वेंचर्स येथे उघडकीस आली.

अंकित कुमार (33) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 35 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला फिर्यादी अंकित कुमार यांच्या घरी घरकाम करत होती. तिने घरातून दहा ग्रॅम वजनाचे 60 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.

Maharashtra : त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


पुणे नाशिक महामार्गावर अपघात, एक जण जखमी (Pimpri Chinchwad Crime News 30 June 2025)

पुणे नाशिक महामार्गावर एका दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला धडक दिली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी (28 जून) सकाळी नाणेकरवाडी येथे घडला.

सुरेश नंदू जावरकर (22, चाकण) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी येथे सुरेश हे रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या अज्ञात दुचाकी चालकाने सुरेश यांना धडक दिली. यामध्ये सुरेश यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर दुचाकी चालक घटनास्थळावरून पळून गेला.


ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोन गंभीर जखमी (Pimpri Chinchwad Crime News 30 June 2025)

पुणे नाशिक महामार्गावर रविवारी (29 जून) सकाळी भीषण अपघात झाला. एका ट्रकने दुचाकीला धडक दिली. दुचाकी वरील व्यक्तीचा मृत्यू झाला. तर महिला आणि चार वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्या.

भूपेंद्र रमेश महाजन (33) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कोमल भूपेंद्र महाजन (26), प्रांजल भूपेंद्र महाजन (4) या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. उमेश प्रवीण माळी (22, कुरुळी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक नरेश बाळासाहेब चौरे (26, हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उमेश यांची बहिण कोमल, तिचे पती भूपेंद्र आणि त्यांची मुलगी प्रांजल असे तिघेजण कुरुळी येथून रावेत येथे दुचाकीवरून जात होते. पुणे नाशिक महामार्गाने जात असताना मोशी येथे त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. भूपेंद्र हे ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले. तर कोमल आणि प्रांजल या गंभीर जखमी झाल्या आहेत.

Talegaon Dabhade : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांसोबतच पालकांनीही पुढाकार घेतला पाहिजे – सोनबा गोपाळे


कामगारांकडून शाळेतील कर्मचाऱ्यास मारहाण (Pimpri Chinchwad Crime News 30 June 2025)

शाळेच्या आवारात खड्डे खोदण्याचे काम करणाऱ्या कामगारांनी शाळेतील कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही घटना रविवारी (29 जून) सकाळी आळंदी येथील अंशुल इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल शाळेच्या आवारात घडली.

शिवाजी भिकनराव जाधव (38, आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुंजाजी प्रल्हाद काळबांडे, प्रभाकर मारोतराव दुधाटे, अनंता पांडुरंग काळबांडे, राजू गणेश काळबांडे, आदिनाथ सोपान काचोळे, कन्हैया मुंजाजी काळबांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे अंशुल इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये काम करतात. आरोपी रविवारी सकाळी शाळेच्या आवारात खड्डे खोदत होते. जाधव यांनी आरोपींना खड्डे खोदण्याबाबत जाब विचारला. त्या कारणावरून आरोपींनी जाधव यांना बेदम मारहाण केली. तसेच अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.


किरकोळ कारणावरून दोघांना मारहाण (Pimpri Chinchwad Crime News 30 June 2025)

रस्त्यामध्ये जेसीबीच्या साह्याने काम करत असलेल्या व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली. ही घटना 27 जून रोजी चऱ्होली बुद्रुक येथे घडली.

पंढरीनाथ रामचंद्र खेडकर (55) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिषेक तापकीर, निलेश काळजे, शाम काटे अक्षय तापकीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खेडकर हे जेसीबीच्या साह्याने रस्त्याचे काम करत होते. त्यावेळी आरोपी पिकअप गाडीतून आले. त्यांनी जोरजोरात हॉर्न वाजवून खेडकर यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्यांना बेदम मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी खेडकर यांचा मुलगा आला असता त्याला देखील आरोपींनी मारहाण करून जखमी केले.

Follow Us On