situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 28 April 2025 : दोन वेगवेगळ्या अपघातात एकाचा मृत्यू, एक जण जखमी

Published On:
Pimpri Chinchwad Crime News 12 June 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – एमआयडीसी भोसरी आणि आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एकाचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. दोन्ही अपघातांची नोंद रविवारी (27 एप्रिल) करण्यात आली ( Pimpri Chinchwad Crime News 28 April 2025 ) आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात कृष्णा म्हेत्रे (28, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. शिवाजीवाडी चौक, मोशी येथे कृष्णा यांचा भाऊ ज्ञानगोंडा सिद्राम म्हेत्रे (26) यांच्या दुचाकीला एका दुचाकीने धडक दिली या अपघातात ज्ञानगोंडा म्हेत्रे हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत दुचाकी चालक तुषार हनुमंत निगडे (27, शिवाजीवाडी, मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात रविवारी (27 एप्रिल) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडला.

आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आळंदी मरकळ रोडवर सोलू येथे 22 एप्रिल रोजी अपघात झाला. विशाल सुधाकर राठोड (25) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रवींद्र बाबूसिंग आडे (44, वाशिम) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शरद शेषराव सुर्वे (29, आळंदी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद सुर्वे याने त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव वेगात चालवून विशाल राठोड यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात विशाल यांच्या डोक्याला, पायाला, तोंडाला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Alandi : पारायण सोहळा अवघ्या पाच दिवसांवर पालिकेचे कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष


कोयत्याने मारहाण करत दापोडीत दहशत, तिघांवर गुन्हा ( Pimpri Chinchwad Crime News 28 April 2025 )

काहीही कारण नसताना मद्यप्राशन केलेल्या तिघांनी रस्त्याने जात असलेल्या तिघांना कोयत्याने मारहाण केली. शिवीगाळ, दमदाटी करत परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना शनिवारी (26 एप्रिल) सायंकाळी महात्मा फुले नगर येथे घडली.

सौरभ किशोर परदेशी (25, बोपोडी) यांनी याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुकेश वाघमारे (दापोडी), ऋषिकेश सुधाकर कसबे (23, बोपखेल) आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मद्य प्राशन करून परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी रस्त्याने पायी जाणाऱ्या लोकांना शिवीगाळ दमदाटी केली. सौरभ परदेशी यांच्या डोक्यात कोयत्याने मारले. तसेच पायावर दगड मारून त्यांना गंभीर जखमी केले. आरोपींनी रोनित सुरेश मोरे, गीतांजली सुरेश मोरे या दोघांना देखील मारहाण करून जखमी केले आहे. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.


महिलेला लोखंडी रॉडने मारहाण ( Pimpri Chinchwad Crime News 28 April 2025 )

महिलेला विनाकारण लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (26 एप्रिल) रात्री नऊ वाजताच्या सुमारास पिरंगुट पुणे येथे घडली.

याप्रकरणी जखमी महिलेने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अद्या बनसोडे (20, पिरंगुट, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला विनाकारण लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ केली. तसेच लोखंडी गजाने पाठीत मारून महिलेला जखमी केले. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

Vadgaon Maval: शिंदेवाडी शाळेत ‘चिमणीसाठी पाणी’ उपक्रम


कॅनडा येथे नोकरी देण्याच्या बहाण्याने 21 लाखांची फसवणूक ( Pimpri Chinchwad Crime News 28 April 2025 )

वाकड येथील एका व्यक्तीला कॅनडा देशात नोकरी देण्याच्या बहाण्याने त्याच्याकडून वेळोवेळी 21 लाख 22 हजार रुपये घेत नोकरी न देता आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना 31 डिसेंबर 2023 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत वाकड येथे घडली.

अनिरुद्ध अनिल थरवल (36, वाकड) यांनी याप्रकरणी 27 एप्रिल 2025 रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी अनिरुद्ध यांच्याशी इंस्टाग्राम वरून संपर्क केला. त्यांना कॅनडा देशात नोकरी देण्याचे अमिष दाखवले. नोकरी मिळविण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून आरोपीने अनिरुद्ध यांच्याकडून 21 लाख 22 हजार 609 रुपये घेतले. त्यानंतर त्यांना नोकरी न देता त्यांची फसवणूक केली. पैसे घेतल्यानंतर आपल्याला नोकरी दिली जात नाही. तसेच आरोपी सोबत कोणताही संपर्क होत नसल्याने अनिरुद्ध यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On