Team My Pune City – भोसरी एमआयडीसी येथील सोमेश्वर भेळ ( Pimpri Chinchwad Crime News 26 August 2025)आणि सागर प्यूजर व्हेज हॉटेल व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाखाली ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद वसंत चव्हाण (वय ४१) आणि मनोज वसंत चव्हाण (वय ३९, दोघेही रा. सेक्टर १०, फॉर्च्यून अपार्टमेंट, भोसरी एमआयडीसी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. संदिप शंकर गवळी (वय ४६, रा. संत तुकारामनगर मार्ग, विनायकनगर, सावता माळीनगर, बो-हाडेवाडी, मोशी, पुणे) यांनी सोमवारी (दि. २५) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान आरोपींनी फिर्यादीकडून ३० लाख रुपये, तसेच त्यांच्या ओळखीचे रघुनाथ सदाशिव बकाल आणि प्रविण भीमशा विरदे यांच्याकडून प्रत्येकी १० लाख रुपये गुंतवले. मात्र, व्यवसायातून मिळणारी रक्कम व्यवसायाच्या चालू खात्यात न जमा करता आरोपींनी स्वतःच्या बँक खात्यात वळवून व्यवसाय तोट्यात दाखवून परस्पर बंद केला. तसेच, सुमारे ३० लाख रुपयांचे फर्निचर विकून फिर्यादींची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास भोसरी पोलीस करत आहेत.
Pratibha College : युवकांनो दिल, दोस्ती, दुनियादारीच्या भानगडीत पडू नका – इंद्रजीत देशमुख
कारच्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू ( Pimpri Chinchwad Crime News 26 August 2025)
भरधाव वेगातील कारने रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. ही घटना ६ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास महिंद्रा सी.आय. कंपनी, वासुली फाटा, ता. खेड येथे घडली.
शौकत मैला शेख (वय ४९, रा. संभाजी फुगे चाळ, खंडोबा माळ, भोसरी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. शंकर आडे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही.) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मयत शौकत यांचे पुतणे सैफअली अख्तर मुल्ला (वय २९, रा. संकेत विहार, लाईन नं. ६, काळे पडळ, हडपसर, पुणे) यांनी सोमवारी (दि. २५) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने (एमएच १४ एफएक्स ४६०८) ही कार भरधाव वेगात चालविली. आरोपी चालवत असलेल्या कारने मयत शौकत यांच्या रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत फिर्यादीचे चुलते शौकत शेख हे गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी ( Pimpri Chinchwad Crime News 26 August 2025)
भरधाव वेगातील कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घअना रविवारी (दि. २४) रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास ढमाले मॉल, दत्तवाडी, नेरे येथे घडली.
विनीत सदाशिव मुसळे (वय ३९, रा. परंदवडी, ता. मावळ, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीच कार चालकाचे नाव आहे. सौरव अरविंदकुमार सिंग (वय २६, रा. ए/११/४०५, एक्सर्विया सोसायटी, दत्तवाडी, नेरे, ता. मुळशी, जि. पुणे) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांनी सोमवारी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनीत मुसळे याने (एमएच १२ एलपी ९००२) या क्रमांकाची सुझुकी एर्टिगा कार निष्काळजीपणे चालवून फिर्यादी यांच्या एफझेडएक्स दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात फिर्यादी सौरव सिंग हे गंभीर जखमी झाले असून, दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.
Vijayrao Kalokhe : तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी विजयराव काळोखे
दुचाकीस्वाराच्या पायावरून गेले कंटेनरचे चाक ( Pimpri Chinchwad Crime News 26 August 2025)
कंटेनरचा धक्का लागून दुचाकीस्वाराच्या पायावरून चाक गेले. ही घटना आंबेठाण चौक चाकण सोमवारी (दि. २५) सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास घडली.
प्रसाद संजय जोंधळे (वय ३२, रा. आंबेठाण चौक, धावड मळा, चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद जोंधळे हे आपल्या दुचाकीवरून (एमएच १७ बीटी १९५८) भोसरीकडे कामावर जात होते. ते आंबेठाण चौकात आले असता त्यांच्या दुचाकीला कंटेनरच्या पाठीमागील बाजूच्या चाकाचा धक्का लागल्याने हा अपघात झाला. प्रसाद जोंधळे यांचा तोल जाऊन ते रस्त्यावर पडले. कंटेनरच्या चाकाखाली त्यांचा डावा पाय आल्याने गुडघा, कंबर व पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर कंटेनर चालक वाहनासह पळून गेला असून त्याचा शोध सुरू आहे. चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत.
आळंदीत पिस्तूलासह तरुणाला अटक ( Pimpri Chinchwad Crime News 26 August 2025)
आळंदी-मारकळ रोडवर पीसीएस चौकाजवळ एका तरुणाला देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. २४) रात्री १०.३५ वाजता करण्यात आली.
ऋषिकेश अर्जुन माळी (वय २२, रा. जामनेर, जि. जळगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस अंमलदार विनोद आबासाहेब वीर यांनी सोमवारी (दि. २५) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी माळी हा राज स्टीलसमोर, आळंदी-मारकळ रोडवर संशयास्पदरीत्या फिरत असताना पोलिसांनी पकडला. त्याच्याकडून किंमत ५२ हजार रुपयांचे एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी आळंदी पोलीस पुढील तपास करत आहेत.