situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 26 April 2025 : सांगवी परिसरात परदेशी महिलेकडून वेश्याव्यवसाय; एक महिला आरोपी गजाआड

Published On:
Pimpri Chinchwad Crime News 18 June 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – सांगवी परिसरातील राधानगर, मैला शुद्धीकरण केंद्राजवळील प्रज्ञा बिल्डिंगमधील एका रूममध्ये परदेशी महिलेकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिला आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई दि. २४ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८.०५ वाजण्याच्या सुमारास करण्यात ( Pimpri Chinchwad Crime News 26 April 2025)आली.

या प्रकरणी भगवंता चिंधु मुठे (वय ३९ वर्षे, पोलीस हवालदार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी महिलेने परदेशी पीडितेला पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले आणि तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला. यावेळी पोलिसांनी छापा टाकून ७,७८० रुपयांचा मुदत माल जप्त केला आहे.

सांगवी पोलीस ठाण्याचे वपोनि बनसोडे यांनी पुढील तपास सुरु केला आहे.


आळंदी येथे पाच जणांनी तरुणाला जबरदस्तीने अपहरण करून मारहाण ( Pimpri Chinchwad Crime News 26 April 2025)

आळंदी येथील पद्मावती झोपडपट्टीमध्ये एका १९ वर्षीय तरुणाला जबरदस्तीने नेऊन मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी ओंकार नवनाथ भोसले (वय १९ वर्षे, रा. आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आयुष संजय पांडे, ओमकार पाटोळे, आयुष राय, राहुल चौधरी आणि तेजस चौहान (सर्व रा. आळंदी) यांनी फिर्यादीला जुने भांडण उरकण्यासाठी टी टाईम चहा हॉटेलजवळून जबरदस्तीने उचलून पद्मावती झोपडपट्टीतील एका पत्र्याच्या खोलीत नेले.

तेथे फिर्यादीला लाकडी काठीने डोक्यात मारहाण केली आणि रुममध्ये कोंडून जिवे मारण्याची धमकी दिली. काही वेळानंतर दरवाजा उघडून फिर्यादीने पळ काढला. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पोउपनि दुधमल तपास करत आहेत.


वराळे येथील रिलायन्स कंपनीत दोन जणांनी सिक्युरिटी गार्डवर लोखंडी रॉड व बियर बॉटलने हल्ला ( Pimpri Chinchwad Crime News 26 April 2025)


खेड तालुक्यातील वराळे गावातील रिलायन्स रिटेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये दोन जणांनी लोखंडी रॉड व बियरची बाटली हातात घेऊन सिक्युरिटी गार्ड आणि कामगारांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.

नामदेव इराप्पा येलगे (वय ४९ वर्षे, रा. आळंदी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी विजय विनोद शिंदे (वय ३२ वर्षे) व रुपेश कैलास जाधव (वय २७ वर्षे) यांनी वाहन खाली करण्याच्या कारणावरून वाद घालून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पोलिसांना बोलावल्यास जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.

दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पोउपनि जाधव पुढील तपास करत आहेत.


मोशी टोलनाक्यावर दुचाकीस्वाराला भरधाव कारने धडक; फिर्यादी गंभीर जखमी (Pimpri Chinchwad Crime News 26 April 2025)

मोशी टोलनाका, पुणे-नाशिक महामार्गावर दुचाकीस्वाराला भरधाव वेगात येणाऱ्या कारने धडक दिल्याने फिर्यादी गंभीर जखमी झाला आहे.

या प्रकरणी सुभाष शंभुनाथ रॉय (वय ५४ वर्षे, रा. दत्त सोसायटी, चिखली) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आपल्या होंडा दुचाकीवरून इंद्रायणी नदीच्या दिशेने जात असताना, मोशी टोलनाक्याजवळ स्वीफ्ट कार (एमएच-१४ ईएच-३४५१) चालवणाऱ्या चालकाने निष्काळजीपणे व वेगात वाहन चालवून त्यांच्या दुचाकीस धडक दिली.

या अपघातामुळे फिर्यादीला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी आरोपी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Follow Us On