Team MyPuneCity – कर्ज न भरल्यामुळे बँकेने जप्त केलेल्या फ्लॅटमधील सिल तोडून बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याचा प्रकार शाहूनगर परिसरात घडला ( Pimpri Chinchwad Crime News 24 May 2025)आहे.
प्रसाद संतोष जाधव (रा. शाहूनगर, चिंचवड) यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. सिडको सोसायटीतील बिल्डिंग क्रमांक डी-४ मधील फ्लॅट क्रमांक १०२, हा त्यांनी बँकेकडून कर्ज घेऊन घेतला होता. मात्र, त्यांनी हप्ते न भरल्यामुळे बँकेने फ्लॅट जप्त करून सिल केले होते.
सिल तोडण्याची ही घटना २२ मे रोजी सकाळी १० ते ११ दरम्यान घडली. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात प्रसाद जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime News: हुंड्यातील ५१ तोळे सोनं बँकेत गहाण; वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा
भोसरीत गांजाची तस्करी करणाऱ्या तरुणाला अटक; ७९७ ग्रॅम गांजा जप्त ( Pimpri Chinchwad Crime News 24 May 2025)
भोसरीतील मच्छी मार्केट परिसरात पोलिसांनी गांजाची विक्री करत असलेल्या एकाला अटक करून त्याच्याकडून ७९७ ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी सनी रामदास शिंदे (वय ३०, रा. महात्मा फुले नगर, भोसरी) हा गुरुवारी (२२ मे) सायंकाळी ७.२० वाजता मच्छी मार्केटजवळील मोकळ्या जागेत उभा होता.
भोसरी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्यावर सापळा रचून झडती घेतली असता त्याच्याकडे गांजाची प्लास्टिक पिशवी आढळून आली.
झडतीमध्ये ७९७ ग्रॅम गांजा, २७०० रुपये रोख रक्कम, मोबाईल व बाईक असा एकूण ३७,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
चिखलीत युवकाकडून ६५८ ग्रॅम गांजा जप्त; अटक ( Pimpri Chinchwad Crime News 24 May 2025)
गांजा बाळगून विक्रीसाठी फिरणाऱ्या एका तरुणाला चिखली पोलिसांनी रंगेहात पकडून ६५८ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी अभिजित जयसिंग तुरुकमारे (वय २५, रा. जयभवानी नगर, चिखली) हा गुरुवारी (२२ मे) रात्री ७.५० वाजता जाधववाडी परिसरातील चौकात संशयास्पद रित्या फिरताना आढळून आला.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ६५८ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण १३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.