Team My Pune City -स्कूल बसने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. ही घटना मुळशी तालुक्यातील तिर्थ अवेला सोसायटीसमोरील पार्किंग परिसरात शनिवारी (दि. २३) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली.
गणेश फांबळे (रा. विशाल चांदेरे, सुस, ता. मुळशी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी कोमल गणेश कांबळे (वय ४०) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नवनाथ रमेश राजगुरु (वय ३५, रा. रेखा सोनवणे यांच्या घरासमोर, पौड, ता. मुळशी, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी बसचालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोमल कांबळे यांचे पती गणेश कांबळे हे शनिवारी सकाळी ९ वाजता कामानिमित्त घराबाहेर गेले होते. तेव्हा आरोपी नवनाथ राजगुरु याने कोणतीही दक्षता न घेता नियमांकडे दुर्लक्ष करून बस रिव्हर्स घेतली. या निष्काळजीपणामुळे बसच्या चाकाखाली आल्याने गणेश कांबळे हे गंभीर जखमी झाले व त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. बावधन पोलीस तपास करत आहेत.
Pune: लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या सदस्यांनी घेतली माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांची भेट
Nutan Maharashtra Engineering : आधुनिक उद्योगांवर आर्टिफिशियल इंटेलिजंसचा सकारात्मक परिणाम – डॉ. दीपक शिकारपूर
ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली ३४ लाखांची फसवणूक
एका नागरिकाला ऑनलाइन शेअर ट्रेडिंग गुंतवणुकीच्या नावाखाली ३३ लाख ७३ हजार २८० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हि घटना हिंजवडी येथे २५ जून ते २९ जुलै या कालावधीत घडली.
दर्पण राजेश्वर राव (वय ३५, रा. पार्क एस्टोरा, मारुंजी लिंक रोड, हिंजवडी) यांनी शनिवारी (दि. २५) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विविध मोबाइल धारक तसेच बँक खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी फेसबुकवर “222 FYERS VIP Trading Strategy” नावाच्या गुंतवणूक ग्रुपची जाहिरात पाहून हा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन केला. आरोपींनी फिर्यादीला FYERS HNI App डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. फिर्यादीकडून तब्बल ३३ लाख ७३ हजार २८० रुपयांची गुंतवणूक करून घेतल्यानंतर आरोपींनी आणखी पैशांची मागणी सुरू केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले.
आरोपींचे मोबाइल क्रमांक 9791941724, 9601304868, 9163832991, 9932502061 आणि विविध बँक खाती तपासात समोर आली आहेत. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
कामाच्या नावाखाली १७ लाखांची फसवणूक
हिंजवडी आयटी हबमध्ये कामाला लावतो, असे सांगत फ्लायनोट सॉस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून फसवणूक करण्यात आली. ही घटना हिंजवडी येथे घडली.
उपेश रंजीत पाटील (रा. हिंजवडी फेस २) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच त्याच्या महिला साथीदाराच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. मयुर मुकुंद वाघ (वय २४, रा. काळेवाडी फाटा) यांनी शनिवारी (दि. २३) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी व इतर उमेदवारांकडून १ लाख ते २.५ लाख रुपये प्रशिक्षण शुल्काच्या नावाखाली घेतले. गुगल मिटद्वारे ३ महिन्यांचे ट्रेनिंग दिल्यानंतर नियुक्तीपत्र, ऑफर लेटर व पगार पत्रे देऊन विश्वास संपादन केला. मात्र, नंतर नापास झाल्याचे सांगत कोणताही पगार न देता आरोपींनी संपूर्ण रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून घेतली. या प्रकरणी आरोपींनी एकूण १७ लाख १६ हजार ५०० रुपयांचा अपहार केला आहे. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
कोट
या गुन्ह्याकडे सुरूवातीपासूनच गांभीर्याने लक्ष्य दिले होते. कारण 400 पेक्ष्या जास्त लोकांची फसवणूक झाली होतीच पण त्यांचे स्वप्न भंगले आहे. त्यांची तक्रार आल्या नंतर मी आणि माझ्या टीमने आयुक्तांच्या आदेशाने उपेश पाटील याला अटक केली आहे. अजून कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी हिंजवडी पोलिसांशी संपर्क करावा.
- बालाजी पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हिंजवडी पोलीस ठाणे