situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri-Chinchwad Crime News 23 May 2025 : एमडी ड्रग्स बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; ड्रग्ससह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

Published On:
Pimpri-Chinchwad Crime News 23 May 2025
---Advertisement---

Team MyPuneCity – वाकड येथील मुंबई-पुणे हायवेवरील अंडरपास ब्रिजखाली एमडी ड्रग्स विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Crime News 23 May 2025) अटक केली. ही कारवाई बुधवारी (21 मे) रात्री करण्यात आली.

अक्षय पप्पु देडे (२८) आणि राहुल सनी देवरे (२२, दोघेही रा. हडपसर, पुणे) अशी अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत. सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेश अनंतराव बलसाने यांनी हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील सूर्या अंडरपास येथे दोघेजण एमडी ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. आरोपींच्या ताब्यातून ६८ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी), दोन मोबाईल फोन व एक मोपेड असा एकूण ७ लाख ५० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

गांजा विक्री प्रकरणी एकास अटक, पाच किलो गांजा जप्त Pimpri-Chinchwad Crime News 23 May 2025

गांजा विक्री प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एकास अटक केली. आरोपीकडून 5.08 किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (22 मे) दुपारी चाकण-तळेगाव रोड येथे करण्यात आली.

बारकु म्हातारवा कानडे (३७, रा. नारायणगाव, जुन्‍नर. मुळ रा. अहिल्यानगर) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल अमोल माटे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपीकडून गांजा बेकायदेशीरपणे विक्रीसाठी बाळगला. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे त्याला एचपी चौक, चाकण-तळेगाव रोडवरून ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन लाख ५४ हजार ३०० रुपये किंमतीचा पाच किलो ८६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Pune Crime News 23 May 2025 : ट्रेडिंग ॲपच्या आमिषाने वाघोलीतील युवकाची २१ लाखांची फसवणूक

कारला दुचाकीची समोरून धडक Pimpri-Chinchwad Crime News 23 May 2025

महाळुंगे येथे रॉंग साईडने येणाऱ्या दुचाकीने कारला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्‍वार जखमी झाला असून दोन्‍ही वाहनांचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी (21 मे) रात्री व्ही डब्ल्यू डी सर्कलजवळ घडली.

उमेश कल्याण शिंदे (३४, बीड) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. मनोजकुमार भागवत माने (३२, खराबवाडी, खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपल्या टाटा टिगॉस कारने चाकण-तळेगाव रोडने जात होते. व्ही डब्ल्यू डी सर्कल जवळ आले असता विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीने माने यांच्या कारला धडक दिली. या अपघातात आरोपी उमेश शिंदे याच्‍या हात, कान, डोळ्याला दुखापत झाली व दोन्‍ही गाड्यांचे नुकसान झाले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

अपघाताचा जाब विचारल्याने दोघांना शिवीगाळ आणि धमकी Pimpri-Chinchwad Crime News 23 May 2025

भरधाव वेगातील कारने धडक दिल्‍यामुळे तीन वाहनांचे नुकसान झाले. कारला धडक दिल्याचा जाब विचारल्याने दोघांना शिवीगाळ आणि धमकी देण्यात आली. ही घटना मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रासमोर बुधवारी (21 मे) रात्री घडली.

रोहीत कुमार (४५, बोपोडी, पुणे) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फोर्ड फिगो कार (एमएच १४/सीके ७१८४) चालक व त्यासोबतचा एक व्‍यक्‍ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कार चालकाने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगात चालवून एका कारला धडक दिली. त्या कारची धडक फिर्यादी यांच्या कारला बसली. यामध्ये तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. याचा जाब विचारत असताना आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या ड्रायव्हरला शिवीगाळ करून धमकी दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

हगवणे पिता-पुत्रास 5 दिवसांची पोलीस कोठडी; कोर्टाबाहेर भाजपच्या महिला आक्रमक, आरोपींवर टोमॅटो फेकले

पूर्ववैमनस्यातून एकास बेदम मारहाण Pimpri-Chinchwad Crime News 23 May 2025

जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला चार जणांनी कड्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना २१ मे रोजी रात्री रमाबाई नगर, पिंपरी येथे घडली.

उज्वल लव्हे (२२), सरोज वाघमारे (१९), सुमित जाधव (१९), सम्यक वाघमारे (२०, पिंपरी) अशी गुन्‍हा दखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी उज्वल, सरोज आणि सुमित या तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी हरी विजयकुमार नायर (३५, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी हरी यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करत सिल्व्हर रंगाच्या कड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

मशीनचे नवीन पार्ट काढून जून पार्ट बसवून फसवणूक Pimpri-Chinchwad Crime News 23 May 2025

चिंचवड एमआयडीसी येथील वालीया ऑटो अ‍ॅन्सिलेरिज कंपनीतील मशिन मेंटेनन्स हेडने व्हीएमसी मशिनचे पार्ट्स बदलून कंपनीची १७ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना ३ मे २०२५ रोजी घडली.

पंकज पाटील व त्याचे इतर साथीदार अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. याबाबत जाधववाडी, चिखली येथील एका ३५ वर्षीय व्यक्तीने पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी पंकज पाटील याने कंपनीच्या मशिनरीच्या देखभालीचे जबाबदारीने पालन न करता व्हीएमसी मशिनचे महत्त्वाचे नवीन पार्ट्स बाहेर विकले. त्याऐवजी जुने पार्ट बसवले. आरोपी पाटील आणि त्‍याच्‍या साथीदारांनी १७ लाख २० हजारांची फसवणूक केली. तसेच कंपनीचे इतर उपकरणे आणि ऑईलसंबंधित मशिन्सच्या बाबतही फसवणुकीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On