Team My pune city – बेकायदेशीरपणे दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ( Pimpri Chinchwad Crime News 23 July 2025) मंगळवारी (२२ जुलै) दुपारी दोन वाजताच्या सुमारास मुळशी तालुक्यातील नेरे दत्तवाडी येथे करण्यात आली.
नागोती बळीराम रास्ते (५५, नेरे दत्तवाडी, मुळशी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कारभारी पालवे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरे वस्ती येथे सांगवडे रोडवर एक व्यक्ती बेकायदेशीरपणे दारू विक्री करत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत नागोती याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पाच हजार ५०० रुपये किमतीची ५५ लिटर दारू जप्त केली आहे.
TQM Convention 2025 : टी क्यू एम कन्व्हेन्शन २०२५ स्पर्धेला २८५ स्पर्धकांचा उस्फूर्त सहभाग
शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक ( Pimpri Chinchwad Crime News 23 July 2025)
शस्त्र बाळगल्या प्रकरणी काळेवाडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई सोमवारी (२१ जुलै) धनगरबाबा मंदिरासमोर थेरगाव येथे करण्यात आली.
सौरभ विकास साठे (२२, निघोजे, खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रमेश खेडकर यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनगरबाबा मंदिरासमोर एक तरुण कोयत्याचा धाक दाखवून लोकांमध्ये दहशत निर्माण करत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर काळेवाडी पोलिसांनी सौरभ साठे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक कोयता जप्त केला आहे.
Nutan Maharashtra Engineering : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये लोकमान्य टिळक जयंती साजरी
दोन दुचाकींची समोरासमोर धडक ( Pimpri Chinchwad Crime News 23 July 2025)
मुंबई-बेंगलोर महामार्गावर भूमकर चौकात दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसली. हा अपघात २० जुलै रोजी रात्री घडला. यामध्ये एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
रणजित दत्तात्रय चांडे (३०, बालेवाडी, पुणे) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहन मनोहर साळवी (२६, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजित हे त्यांच्या दुचाकी (एमएच ४२/बीए ८६५३) वरून किवळे येथून बालेवाडी येथे घरी जात होते. मुंबई-बेंगलोर महामार्गावर भूमकर चौकात आरोपी रोहन हा त्याच्या दुचाकी (एम एच ०८/एएम ९३२०) वरून विरुद्ध दिशेने आला. त्याने त्याच्या दुचाकीने रणजित यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये रणजित हे गंभीर जखमी झाले.