situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 20 June 2025: दारू विक्री प्रकरणी हिंजवडी, निगडी मध्ये कारवाया

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –बेकायदेशीरपणे दारू विक्री केल्याप्रकरणी हिंजवडी आणि निगडी येथे दोन कारवाया करण्यात आल्या. याप्रकरणी गुरुवारी (19 जून) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस कॉन्स्टेबल मितेश यादव यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाकडकर वस्ती येथील एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडकर वस्ती येथे एक महिला बेकायदेशीरपणे दारू विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत नऊ हजार पाचशे रुपये किमतीची 95 लिटर गावठी दारू जप्त केली आहे.

पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर कौलगे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार आकाश अनिल रोकडे (24, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिकन चौक निगडी येथे एक तरुण दारू विक्री करत असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आकाश रोकडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 7000 रुपये किमतीची 70 लिटर दारू जप्त केली आहे.


आत्महत्येस प्रवृत्त करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोघांना अटक

पत्नीने पतीला आत्महत्येस प्रवृत्त केले. पतीच्या आत्महत्ये नंतर मृतदेह दूर नेऊन फेकल्याचे उघडकीस आले. जगतापनगर, थेरगाव येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तय्युबशहा उस्मानशा (थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा तोसीफ तय्युब शहा यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तय्युब शहा यांची पत्नी (32), साहिल कैलास घाडगे (21) या दोघांना अटक केली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलाच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

Pune : कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलची नुसतीच ‘ढोल-बडवणी’, वास्तवात मात्र निराशा – रघुनाथ कुचिक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तोसीफ याचे वडील तय्युब शहा उस्मानशा यांना पत्नीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याने त्यांनी 14 जून रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपी पत्नी हिच्या सांगण्यावरून आरोपी साहिल याने अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन मृतदेह मावळ तालुक्यातील दारूंब्रे या गावच्या हद्दीत फेकून दिला.


रिंगरोडचे काम मिळवून देण्याचे अमिष दाखवत 13 लाखांची फसवणूक

मंत्रालयात ओळख असल्याचे सांगत एका ठेकेदाराकडून 13 लाख रुपये उकळून फसवणूक केली. ही घटना 10 मार्च ते 11 मे दरम्यान बाणेर येथे घडली.

पठाण खान (मोबाइल 9665077729) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुळशी तालुक्यातील घोटावडे येथील एका ठेकेदाराने गुरुवारी (19 जून) बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून रिंगरोडचे काम मिळवून देतो, असे भासवत फिर्यादीकडून वेळोवेळी एकूण 13 लाख रुपये घेत फसवणूक केली.


कारच्या धडकेत पादचारी महिला जखमी

भरधाव वेगातील कारने धडक दिल्यामुळे पादचारी महिला जखमी झाली. ही घटना सांगवी-किवळे बीआरटी मार्गावर रावेत येथे मंगळवारी (17 जून) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.

अस्मिता संजय कांबळे (38, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अपघातात जखमी झालेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांचे पती संजय कांबळे (47) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पालिसांनी पांढर्‍या रंगाच्या अज्ञात चारचाकी वाहनावरील चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास फिर्यादी यांची पत्नी अस्मिता या किवळे सांगवी बीआरटी मार्गावर सिलेस्टीयल सिटी चौक येथे रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या पांढर्‍या रंगाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात अस्मिता या गंभीर जखमी झाल्या आहेत. उपघातानंतर कार चालकाने अस्मिता यांना कोणतीही वैद्यकिय मदत न देता पळून गेला.


दुचाकीच्या धडकेत सासू-सून जखमी

भरधाव वेगातील दुचाकीने पाठीमागून धडक देत एका महिलेच्या सासूला गंभीर दुखापत केली. ही घटना गुरुवारी (१९ जून) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील आळंदी येथे घडली.

भावना निकम (24, आळंदी) असे जखमी महिलेचे नाव असून त्यांनी यबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (एमएच 14/एलएच 8007) या दुचाकीवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांची सासू रस्त्याने पायी चालल्या होत्या. त्या पीसीएस चौक, आळंदी येथे आल्या असता भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. फिर्यादी किरकोळ जखमी तर त्यांच्या सासूला गंभीर दुखापत झाली.

Follow Us On