situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 20 August 2025 : फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली ५४ लाखांची फसवणूक

Published On:
Pimpri Chinchwad Crime News 20 August 2025

Team My pune city – रावेत येथील देवकर प्लाझा (Pimpri Chinchwad Crime News 20 August 2025)बिल्डींगमध्ये फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली ५४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना जुलै २०१९ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडली.

या प्रकरणी विशाल लक्ष्मण ओव्हाळ (३२, कावेरीनगर, पोलीस वसाहत, वाकड) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिल दत्तात्रय देवकर आणि कुमोद अनिल देवकर (निगडी प्राधिकरण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी संगनमत करून देवकर प्लाझा बिल्डींगमध्ये फ्लॅटचे बांधकाम पूर्ण न करता, त्याचा ताबा न देता, फिर्यादी आणि त्यांचे मित्र अनिल जगताप व जावेद मुजावर यांच्याकडून धनादेश आणि आरटीजीएसद्वारे एकूण ५४ लाख ५० हजार रुपये स्वीकारले. आरोपींनी या संपूर्ण रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला आणि फिर्यादीची फसवणूक केली. तसेच, आरोपींनी फिर्यादीला धमकी देखील दिली. रावेत पोलीस तपास करत आहेत.


कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू (Pimpri Chinchwad Crime News 20 August 2025)

सुस-नांदे रोडवर, तापकीर फार्म हाऊस समोर झालेल्या एका अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना १७ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी प्रशांत तुकाराम गोफने (२९, गुलमोहर प्लाझा, पाषाण पुणे) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आणि त्यांचा मित्र अक्षय भागवत करे हे दोघे दुचाकीवरून जात असताना, समोरून आलेल्या भरधाव वेगातील स्वीप्ट कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात फिर्यादीच्या दोन्ही पायाला खरचटले, डाव्या पायाच्या अंगठ्याला आणि गुप्तांगाला मार लागला. फिर्यादीचा मित्र अक्षय करे याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघात करून आरोपी घटनास्थळी न थांबता पळून गेला. या अपघातात फिर्यादीच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे. बावधन पोलीस तपास करत आहेत.


वाहन चोरीप्रकरणी दोघांना अटक (Pimpri Chinchwad Crime News 20 August 2025)

नागेश्वर महाराज उप बाजार समितीतील भुसार मार्केट येथून वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. वाहन चोरीची घटना १६ ऑगस्ट रोजी पहाटे ४ ते सकाळी ६.३० च्या दरम्यान घडली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजकुमार महालिंग बागल (३५, आल्हाट वस्ती, मोशी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात आरोपीने त्यांची ५० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल चोरली. पोलिसांनी तपास करून संतोष उर्फ शरद गजानन इंगोले (२९, खंडोबा मंदिर, कुटे कॉलनी, आळंदी, पुणे) आणि ज्ञानेश्वर गजानन इंगोले (३२, कुटे कॉलनी, आळंदी) यांना अटक केली आहे. फिर्यादीने त्यांची दुचाकी दुकानासमोर लॉक करून पार्क केली होती. ती अज्ञात व्यक्तीने त्यांच्या संमतीशिवाय चोरी केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

Pimpri Flood : पिंपरी चिंचवड महापालिकेने पुराने बाधित झालेल्या भागातील ९५० नागरिकांचे सुरक्षित स्थळी केले स्थलांतर


बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक (Pimpri Chinchwad Crime News 20 August 2025)

बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई १८ ऑगस्ट रोजी रात्री थेरगाव स्मशानभूमी जवळ, जगताप नगर येथे करण्यात आली.

पोलिस कॉन्स्टेबल तौसीफ शेख यांनी या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चैतन्य नागनाथ माने (१९, शिवतीर्थनगर, थेरगाव) आणि विशाल उर्फ मन्या उर्फ विशाल भीमराव कांबळे (२१, थेरगाव) यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपी चैतन्य मानेकडे एक लोखंडी कोयता आणि आरोपी विशाल कांबळेकडे चार कोयते असे एकूण पाच लोखंडी कोयते पोलिसांना आढळून आले. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.


पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक (Pimpri Chinchwad Crime News 20 August 2025)

फुगेवाडी फ्लायओव्हर खालील पार्किंगमध्ये एका तरुणाला बेकायदेशीरपणे पिस्टल आणि जिवंत काडतुस बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (१९ ऑगस्ट) रात्री १०.४० वाजता करण्यात आली.

पोलिस कॉन्स्टेबल नवनाथ पोटे यांनी या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर श्याम गायकवाड (२१, दापोडी, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.

आरोपी सागर गायकवाड याच्याकडे पोलिसांनी ४५ हजार रुपये किमतीची देशी सिल्वर रंगाची पिस्टल आणि एक जिवंत काडतुस विनापरवाना बेकायदेशीरपणे बाळगताना आढळले. दापोडी पोलीस तपास करत आहेत.


बेकायदेशीरपणे कट्टा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक (Pimpri Chinchwad Crime News 20 August 2025)

मोरे वस्ती, चिखली येथील मोकळ्या मैदानात एका तरुणाला बेकायदेशीरपणे गावठी बनावटीचा कट्टा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (१९ ऑगस्ट) पहाटे करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब गर्जे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजनकुमार इंद्रदेव राजभर (२९, मोरेवस्ती, चिखली) याला अटक करण्यात आली आहे.

आरोपी राजनकुमारकडे ४० हजार रुपये किमतीचा एक लोखंडी स्टीलसारखा गावठी बनावटीचा कट्टा कोणताही परवाना नसताना पोलिसांना मिळून आला. चिखली पोलीस तपास करत आहेत.


गांजा बाळगणाऱ्या महिलेला अटक (Pimpri Chinchwad Crime News 20 August 2025)

चिखली येथील भांगरे कॉलनी, पाटीलनगर येथे एका महिलेला बेकायदेशीरपणे गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (१९ ऑगस्ट) दुपारी १.२० वाजता करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत जाधव यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एका ३२ वर्षीय महिलेला (पाटीलनगर, चिखली, पुणे) अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना आरोपी महिलेकडे १३०० रुपये किमतीचा २६ ग्रॅम गांजा विक्रीसाठी बेकायदेशीररित्या बाळगलेला आढळला. या प्रकरणी चिखली पोलीस तपास करत आहेत.

Kundamala News : कुंडमळा येथील तुटलेल्या पुलाचा सांगाडा नदीत गेला वाहून


पिस्टल आणि काडतुस बाळगल्याप्रकरणी एकाला अटक (Pimpri Chinchwad Crime News 20 August 2025)

वाकड येथील किंग्स काउंटी बांधकाम साईटच्या फुटपाथवर एका तरुणाला बेकायदेशीरपणे पिस्टल आणि जिवंत काडतुस बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (१९ ऑगस्ट) दुपारी करण्यात आली.

या प्रकरणी सहाय्यक फौजदार नरेश बलसाने यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रमोद अंकुश कळंबे (२१, पर्वती दर्शन, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.

आरोपीकडे ५० हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल आणि १००० रुपये किमतीचे एक जिवंत काडतुस विनापरवाना बाळगलेले आढळून आले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.


लग्नाच्या आमिषाने १४ लाखांची फसवणूक (Pimpri Chinchwad Crime News 20 August 2025)

मॅट्रोमोनी ॲपवर ओळख झालेल्या एका तरुणाने लग्न करण्याचे आश्वासन देऊन एका महिलेची १४ लाख ४४ हजार ७०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना २०२३ पासून १९ ऑगस्ट २०२५ पर्यंत पिंपरी येथे घडली.

सिम्पल संजीव भोसले (३३, शितळानगर, देहुरोड) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी शार्दुल अविनाश म्हेत्रे (३५, मार्केटयार्ड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीने मॅट्रोमोनी ॲपवरून मैत्री करून, लग्न करण्याचे आश्वासन दिले. आरोपीने त्याच्या आई-वडिलांच्या आजारपणाचे आणि वैयक्तिक अडचणींचे कारण सांगून फिर्यादीकडून वेळोवेळी धनादेश, क्रेडिट कार्ड आणि बँकेतून एकूण १४ लाख ४४ हजार ७०० रुपये घेतले. त्यापैकी ३ लाख ९३ हजार ९१ रुपये परत करून उर्वरित १० लाख ५१ हजार ६०९ रुपये परत न करता, त्याने फिर्यादीशी लग्न करण्यास नकार दिला आणि फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.


हॉटेल रेटिंगच्या नावाखाली फसवणूक (Pimpri Chinchwad Crime News 20 August 2025)

भोसरी येथील एका महिलेची हॉटेलला रेटिंग देऊन पैसे कमावण्याच्या नावाखाली २ लाख १२० रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना २१ जून रोजी शास्त्री चौक, भोसरी येथे आणि २४ जून रोजी बेळगाव, कर्नाटक येथे घडली.

एका ३१ वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीने फिर्यादी महिलेसोबत टेलीग्राम अकाउंट वरून संपर्क साधला. त्यांना हॉटेल रेस्टॉरंटला ५ स्टार रेटिंग देऊन त्याचे स्क्रीनशॉट पाठवण्याचा टास्क दिला. सुरुवातीला आरोपीने फिर्यादीला काही पैसे ट्रान्सफर करून त्यांचा विश्वास जिंकला आणि त्यानंतर मिळालेले पैसे बिटकॉइनमध्ये ट्रेडिंग करून अधिक नफा देण्याचे आश्वासन दिले. या बहाण्याने आरोपीने ९ ट्रान्झॅक्शनद्वारे १ लाख १२ हजार ४० रुपयांची फसवणूक केली. फसवणूक झालेली रक्कम परत मिळवण्यासाठी फिर्यादीने गुगलवर सर्च करून मोबाईल नंबर मिळवला. या नंबरच्या धारकाने स्वतःला एनपीसीआयचा अधिकारी असल्याचे सांगून फिर्यादीला त्यांच्या यूपीआय आयडीवर ८८ हजार ८० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. एकूण २ लाख १२० रुपयांची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.


Follow Us On