Team My Pune City –हॉटेल चालविण्यासाठी प्रत्येक महिन्याला १० हजार रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (१७ सप्टेंबर) रात्री खेड तालुक्यातील वराळे गावातील हॉटेल श्रेयस येथे घडली.
नागेश गोपीनाथ शिंदे (३९, रोहकल, खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गणेश बाबाजी डुंबरे (३१, ओतूर, जुन्नर) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डुंबरे यांचे वराळे येथे हॉटेल आहे. आरोपी नागेश बुधवारी रात्री डुंबरे यांच्या हॉटेलमध्ये आला. त्याने डुंबरे यांना धमकी देत इथे हॉटेल चालवायचे असेल तर मला प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये हप्ता द्यावा, लागेल. अशी मागणी केली. तसेच हॉटेल मध्ये काम करणाऱ्या महिलेसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. डुंबरे आणि हॉटेल मधील कामगाराला मारहाण करून धमकी दिली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
Pune:विकसित मराठवाड्यासाठी गावाशी नाळ जोडलेली ठेवा;जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव व्यंकटराव गायकवाड यांचे प्रतिपादन
Mangrul: मंगरूळ येथे अध्यात्मिक व सामाजिक उपक्रमाचे उत्साहात आयोजन
महिंद्रा कंपनीत चोरी, एकाला अटक
खेड तालुक्यातील निघोजे येथे महिंद्रा कंपनीत एका व्यक्तीने चोरी केली. कंपनीतून एक लाख रुपये किमतीच्या बॅटरी केबल चोरून नेल्या. पोलिसांनी व्यक्तीला अटक केली आहे. ही घटना बुधवारी (१७ सप्टेंबर) दुपारी घडली.
आकाश राजाराम डोंगरे (२९, आळंदी, खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश चंद्रकांत बाबर (४२, मोशी) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश याने निघोजे येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत प्रवेश केला. कंपनीतून एक लाख चार हजार १९० रुपये किमतीच्या बॅटरीच्या केबल त्याने चोरी केल्या. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
बेकायदेशीरपणे गॅस साठा केल्याबाबत दोघांना अटक
बेकायदेशीरपणे लोकवस्ती मध्ये गॅस साठा करून ठेवल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. खेड तहसील कार्यालयाकडून बुधवारी (१७ सप्टेंबर) सकाळी महाळुंगे इंगळे गावात ही कारवाई करण्यात आली.
रोहन मोहन कोरके (२२), ऋषिकेश रामचंद्र जावळे (२७, महाळुंगे इंगळे, खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक अधिकारी महादेव अर्जुन कुंभार (४०) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेकायदेशीरपणे त्यांच्या गॅस रिफिलिंग दुकानात गॅस सिलेंडरचा साठा करून ठेवला. खेड तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. यामध्ये एक वाहन आणि गॅस सिलेंडर असा एकूण दोन लाख सात हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.