situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 12 September 2025: गांजा विक्री प्रकरणी तरुणाला अटक

Published On:

Team My Pune City –गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (११ सप्टेंबर) दुपारी अजंठानगर, चिंचवड येथे करण्यात आली.

विशाल मातीबर गौतम (२१, चिंचवड) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद कलाटे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल गौतम हा गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून विशाल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० हजार ३०० रुपये किमतीचा २०६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. निगडी पोलीस तपास करत आहेत.

Chakan: चाकण नगरपरिषद हद्दीतील १५० अतिक्रमणांवर हातोडा

Bapusaheb Bhonde Highschool : ॲड बापूसाहेब भोंडे हायस्कूलमध्ये राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा


दहशत निर्माण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका १७ वर्षीय मुलाला मारहाण करून त्याचे आणि त्याच्या मित्राचे मोबाईल व मोटारसायकल चोरून नेली. ही घटना बुधवारी (१० सप्टेंबर) दुपारी अंकुश चौक, ओटा स्कीम निगडी येथे घडली.

याप्रकरणी १७ वर्षीय मुलाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यश आकाश खंडाळे (२३), हेमंत आकाश खंडाळे (२५), सोहेल संतोष जाधव (२०) आणि ऋषी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहेल जाधव याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलाने आरोपींना पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्याला लोखंडी फायटर आणि कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण केली. तसेच, सर्व आरोपींनी मिळून त्याला व त्याच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. त्यांनी पीडित मुलाचा मोबाईल, स्लेंडर मोटारसायकल आणि त्याच्या मित्राचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण १ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला. शस्त्रे दाखवून आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.


पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण

जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला दगडाने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (११ सप्टेंबर) रात्री तपोवन मंदिर रोड, पिंपरी गाव येथे घडली.

योगेश मधुकरराव खनगे (४५, पिंपरी गाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निलेश बाबू टोपे (१९, आंबेडकर कॉलनी, पिंपरी) आणि संतोष सुनील पवार (२५) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी योगेश यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. निलेश टोपे याने योगेश यांच्या कपाळावर दगडाने मारून जखमी केले. तसेच, दोन्ही आरोपींनी मिळून योगेश यांच्या दुचाकी आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या घराच्या खिडक्यांवर दगड मारून काचा फोडून नुकसान केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.


अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध जखमी

पायी चालत जाणाऱ्या वृद्ध व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक देऊन जखमी केले. हा अपघात १ सप्टेंबर रोजी घडला असून याप्रकरणी ११ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर वाहन चालक पळून गेला.

विजय इरन्ना नायडू (६०, देहुरोड) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय नायडू हे पूजेसाठी फुले आणण्यासाठी पायी जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या उजव्या पायाच्या नडगीचे हाड आणि उजव्या हाताच्या मनगटाजवळील हाड फ्रॅक्चर झाले, तसेच उजव्या डोळ्याच्या भुवईजवळ जखम झाली. अपघातानंतर वाहन चालक कोणतीही मदत न देता पळून गेला. उपचारानंतर नायडू यांनी पोलिसात तक्रार दिली. देहुरोड पोलीस तपास करत आहेत.


अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

पायी चालत जाणाऱ्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात ७ सप्टेंबर रोजी दुपारी जे बी एम कंपनीजवळ महाळुंगे येथे घडला.

अनिस वाजीदअली अहमद असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. समीर अनिस अहमद (२२, महाळुंगे, खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील अनिस अहमद हे महाळुंगे गावाकडून एचपी चौकाकडे पायी जात होते. त्यावेळी एचपी चौकाकडून महाळुंगेकडे येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत अनिस यांना समोरून धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

Follow Us On