Team MyPuneCity – चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारी एका फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. वाल्हेकरवाडी परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय फिर्यादीने ( Pimpri Chinchwad Crime News 10 May 2025)त्यांची तीन लाख रुपये किमतीची टोयोटा इटिऑस कार (क्रमांक एम.एच.१४/एफ.सी.२८९०) सौरभ सुधाकर बावणकर (वय ३० वर्ष, रा. चंदननगर, पुणे) याला भाड्याने चालवण्यासाठी दिली होती. आरोपी बावणकरने फिर्यादीला सदर कार कंपनीत भाड्याने लावण्याचे खोटे आश्वासन दिले आणि त्यांच्याकडून कारची मूळ कागदपत्रे घेतली. त्यानंतर त्याने स्वतःच्या फायद्यासाठी ती कार गहाण ठेवून फिर्यादीचा विश्वासघात करत फसवणूक केली. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी भा.न्या.सं. कलम ३१६(२) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
———
२. महाळुंगे एमआयडीसी: अज्ञात ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू; चालकाचा शोध सुरू ( Pimpri Chinchwad Crime News 10 May 2025)
महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी सकाळी एका हृदयद्रावक घटनेत अज्ञात ट्रकच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मौजे बेलवाडी येथे टावर लाईन हॉटेलसमोर येलवाडी ते देहगाव जाणारे रोडवर ही घटना घडली. फिर्यादी (वय ३० वर्ष, गृहिणी, सध्या रा. देहुगाय) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पती मारोती दिनकर मुंडे (वय ३७ वर्ष) हे रस्त्याच्या कडेला थांबले असताना एका अज्ञात ट्रक चालकाने त्याचे वाहन निष्काळजीपणे चालवले आणि ट्रकचे मागील चाक मुंडे यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक त्याचे वाहन घेऊन फरार झाला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी भा.न्या.सं. कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मो.वा.का.क. १८४, १३४(अ) (य) अन्वये गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गुमाणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
———
३. निगडी: मालकीच्या घरात घुसून भाडेकरूला धमकावले; तीन जणांवर गुन्हा ( Pimpri Chinchwad Crime News 10 May 2025)
निगडी पोलीस स्टेशनमध्ये एका मालमत्तेच्या वादातून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मुसा रहीमान गडकरी (वय ६० वर्षे, सध्या रा. चिंचवड स्टेशन, पुणे) यांच्या मालकीचे घर (स.न. १७९/५, पंचतारानगर, आकुर्डी, पुणे) येथे भाडेतत्वावर वरुण राधेशाम कुमार नावाचा व्यक्ती राहत होता. आरोपी यासीन गडकरी, त्याची पत्नी आणि त्याची आत्या (सर्व रा. आकुर्डी आणि निगडी) यांनी भाडेकरूला शिवीगाळ व दमदाटी करून त्याला घरातून बाहेर काढले आणि १६ एप्रिल २०२४ पासून बेकायदेशीरपणे त्या घरावर ताबा मिळवला. या प्रकरणी निगडी पोलिसांनी भा.दं.नि. कलम ४४७, ४४८, ५०४, ५०६ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक मणेर पुढील तपास करत आहेत.
———
४. रावेत: गांजा विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; ७५ हजारांची रिक्षा आणि २८ हजारांचा गांजा जप्त ( Pimpri Chinchwad Crime News 10 May 2025)
रावेत पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अंमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. ऐश्वर्यम ग्रुपच्या मोकळ्या जागेसमोर, पुणे-बेंगलोर हायवेकडे जाणाऱ्या रोडवर पोलिसांनी उमेश तानाजी शिंदे (वय २० वर्षे, रिक्षाचालक, रा. वाकड) आणि रोहन रोहीदास ठाकुर (वय १९ वर्षे, रा. बेरगाव, वाकड) या दोघांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी ७५ हजार रुपये किमतीची रिक्षा आणि २८ हजार ३०० रुपये किमतीचा ५६६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. आरोपी हे अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगताना मिळून आले. रावेत पोलिसांनी एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क) आणि २० (ब) (ii) (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख पुढील तपास करत आहेत.
———
५ .आळंदी: पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की आणि सरकारी कामात अडथळा; दोघांविरुद्ध गुन्हा ( Pimpri Chinchwad Crime News 10 May 2025)
आळंदी पोलिसांनी गुरुवारी रात्री दोन जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे आणि पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मोत्सव रथोत्सवाच्या बंदोबस्तादरम्यान आळंदी-वडगाव रोडवरील हिताची एटीएम चौकात पोलीस कर्मचारी संदीप रामचंद्र जगदाळे वाहतूक नियमन करत असताना आरोपी स्वप्नील तुकाराम देवकर (रा. बोपखेल) याने त्यांच्याशी हुज्जत घातली आणि त्यांना धमकावले. तसेच, दुसरा आरोपी रवींद्र उत्तम खांडवे (पत्ता अज्ञात) याने फिर्यादीला गाडी बाजूला घेण्यास सांगितल्यावर त्यांना गाडीने धडक दिली, ज्यामुळे ते जखमी झाले. आळंदी पोलिसांनी भा.न्या.सं. कलम १३२, १२१(१), ३५१(१), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गिरीगोसावी पुढील तपास करत आहेत.
———
६ .सांगवी: तडीपार गुन्हेगाराला मेफेड्रॉनसह अटक; दुचाकी आणि मोबाईल जप्त ( Pimpri Chinchwad Crime News 10 May 2025)
सांगवी पोलिसांनी गुरुवारी रात्री औंध जिल्हा रुग्णालयाजवळ एका तडीपार गुन्हेगाराला अटक केली आहे. आकाश बाबुलाल पवार (वय २५ वर्ष, रा. नहे नगर, काळेवाडी, पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तो मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२ यांच्या तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून शहरात फिरत होता. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ४१ हजार ३०० रुपये किमतीचे ४.१३० ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.), १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी (क्रमांक एम.एच.१४-एफ.यु.-७५९०) असा एकूण ९१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगताना मिळून आला. सांगवी पोलिसांनी एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक कलकुटगे पुढील तपास करत आहेत.
Add Post
