Team Pune City –ओळखीच्या मित्राने विश्वासघात करून महिंद्रा झायलो गाडीचा अपहार केल्याची घटना निगडी येथे उघडकीस आली. ही घटना ओटास्कीम, निगडी येथे घडली.
विलास उत्तम राठोड (वय 34, रा. वानटाकळी तांडा, जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. इमरान नईम खान (वय 29, रा. श्रमिकनगर सोसायटी, ओटास्केम, निगडी) यांनी शनिवारी (दि. ९) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हीघटना २३ ते २४ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ओटास्कीम निगडी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राठोड याने फिर्यादी इमरान खान यांचा विश्वास संपादन केला. इमरान यांच्या मालकीची महिंद्रा झायलो (एमएच 04 एफएफ 4906) ही घेऊन जाऊन अपहार केला. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
रस्त्यात अडवून टोळक्याकडून मारहाण
कंपनीतील वादाच्या कारणावरून एका टोळक्याने तरुणाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याचीही धमकी दिली. ही घटना आळंदी मरकळ रोडवर शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.
किशन परसराम वरताळे (वय 28), साईनाथ किशन वरताळे (वय 24), समीर यादव गजभारे (वय 20) व एक काळा शर्ट घातलेला अनोळखी इसम आणि दोन अल्पवयीन मुले अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. धिरज ज्ञानेश्वर कोलते (वय 32, रा. गुरुदत्त कॉलनी, मोशी) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी शनिवारी (दि. ९) याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कंपनीमध्ये आरोपी किसन वरताळे याच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. याचा राग मनात धरून आरोपींनी आपसांत संगनमत करून शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास फिर्यादी धिरज यांचा रस्ता अडवून शिवीगाळ, लाथा बुक्क्यांनी तसेच कमरेच्या बेल्टने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. आळंदी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
भरधाव वेगातील कारने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना ६ ऑगस्ट रोजी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास पिंपरीगाव येथे घडली.
रौनक वासुदेव डोलवाणी (वय 38, रा. वैभवनगर, पिंपरी) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांनी शनिवारी (दि. ९) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (एमएच 14 केडब्ल्यू 1081) या कारवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रौनक डोलवाणी हे त्यांच्या सुझुकी अॅक्सिस दुचाकीवरून चालले होते. ते पिंपरीगावातील महावितरणच्या कार्यालयाजवळ आले असता भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रौनक डोलवाणी हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर कार चालक घटना स्थळावरून पळून गेला. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
Talegaon MIDC : तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये उत्साहात रक्षाबंधन सण साजरा!
Amit Gorkhe: आमदार अमित गोरखे यांच्या कार्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मानले आभार
पत्यांचा जुगार खेळल्याप्रकरणी एकावर गुन्हा
तीन पत्यांचा जुगार खेळणाऱ्या एकाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (दि. ९) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास महाळुंगे एमआयडीसी परिसरात करण्यात आली.
भरत तुफाणी जैस्वार (वय 38, रा. महाळुंगे, मूळ रा. वरळी, मुंबई) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार राजेश वसंत गिरी यांनी शनिवारी याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भरत जैस्वार याला तीन पत्यांचा जुगार खेळताना पकडण्यात आले. त्याच्याकडून एक हजार ७०० रुपये रोकड आणि तीन पत्यांचे पाने असा ऐवज जप्त करण्यात आला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.