situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 1 June 2025: कारच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

Published On:

Team MyPuneCity – भरधाव वेगातील कारने धडक दिल्यामुळे पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना मोशी येथे 25 मे रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.

संतोष तुकाराम हजारे (वय 51) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पादचार्‍याचे नाव आहे. पोलिसांनी (एमएच 14 एलयू 9496) या कारवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू शिवाजी नाणेकर (वय 58, रा. नाणेकर वाडी, ज्योतिबा मंदिराजवळ, ता. खेड, जि. पुणे) यांनी शनिवारी (दि. 31) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पादचारी संतोष हजारे हे रस्ता ओलांडत असताना अज्ञात चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत धडक दिली. अपघातानंतर आरोपीने पोलिसांना न कळवता व जखमीस रुग्णालयात न नेत घटनास्थळावरून गाडी घेऊन फरार झाला. या अपघातात हजारे यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

बसच्या धडकेत दाम्पत्य जखमी

पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) – बस अचानक उजवीकडे वळवून दुचाकीला धडक दिली. या अपघातात दाम्पत्य जखमी झाले. ही घटना एमआयडीसी भोसरी येथे 24 मे रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.

लखन प्रकाश गायकवाड (वय 35, रा. नंदनवन कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी, पुणे) यांनी शनिवारी (दि. 31) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (एमएच 11 सीएच 6433) या बसवरील चालक आकाश हामा (वय 30) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पत्नीला कामावर सोडण्यासाठी जात असताना आरोपी बस चालकाने वाहतुकीचे नियम पाळले नसल्याने ट्रक अचानक उजवीकडे वळवला व मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात फिर्यादी व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

ट्रकमधून 12 म्हशींची सुटका

पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) – ट्रकमधून परवाना नसतानाही 12 म्हशींची वाहतूक केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास चाकण येथे घडली.

पोलीस अंमलदार संदीप बाळासाहेब मेरगळ (वय 32) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मुस्तफा हनीफ कुरेशी (वय 23, रा. मोरवाडी, लाल टोपी नगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रकमध्ये 12 म्हशी दाटीवाटीने, कोणत्याही चारा-पाण्याची व्यवस्था व परवाना नसताना वाहतूक करत असल्याचे आढळून आले. म्हशी कत्तलीसाठी नेत असल्याचा पोलिसांना संशय आहे. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

दोन तरुणांना गांजासह अटक

पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) – विक्रीसाठी बाळगलेल्या गांजासह दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली. शनिवारी (दि. 31) दुपारी बारा वाजताच्या सुमारास नेवाळे वस्ती, चिखली येथे ही कारवाई करण्यात आली.

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस अंमलदार आशिष ज्ञानदेव बनकर यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अक्षय बाळासाहेब हिंगे (वय 27, रा. सणसर ता. इंदापूर, जि. पुणे) आणि प्रतीक दत्तात्रय निंबाळकर (वय 28, रा. भवानीनगर, ता. इंदापूर, जि. पुणे) या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आरोपींना हॉटेल ट्रेंड मैफिल समोर संशयावरून तपास ताब्यात घेतले.त्यांच्याकडून एक लाख 25 हजार रुपयांची दुचाकी व एक लाख चार हजार रुपये किंमतीचा दोन किलो 84 ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Follow Us On