situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 09 July 2025 : काळेवाडीत रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला

Published On:
Pimpri Chinchwad Crime News 09 July 2025

Team My pune city – काळेवाडी परिसरात एका तरुणाने रिक्षाचालकाच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली व पोलिसांना बोलावल्याचे सांगितल्याने संतापून त्याच्यावर ब्लेडने वार केले. तसेच कोयता काढून दहशत निर्माण केली. ही घटना ७ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास गणराज कॉलनी, आदर्शनगर, काळेवाडी येथे ( Pimpri Chinchwad Crime News 09 July 2025 ) घडली.

प्रेम ऊर्फ सोन्या बालाजी पोतदार (२३, सांगवी) यास अटक करण्यात आली आहे. मधुकर विष्णु तमाके (५६, काळेवाडी) यांनी याबाबत काळेवाडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घरासमोर आरोपीने शिवीगाळ केली. पोलिसांना बोलवतो असे सांगताच त्याने ब्लेडने फिर्यादीच्या डाव्या हनुवटीवर व कपाळावर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर दुचाकीवर लावलेला कोयता काढून हवेत फिरवत “मी इथला भाई आहे, तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली व परिसरात दहशत माजवत पळून गेला.


खंडणी प्रकरणी एकास अटक ( Pimpri Chinchwad Crime News 09 July 2025 )

भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत एका दुकानदाराकडे दरमहा खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत कोयता दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १ जुलै रोजी घडली आहे.

शिवशंकर ऊर्फ दाद्या संभांजी राक्षे (३२, भोसरी) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. पांडुरंग राजहंस बिरादार (२९, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, बिरादार यांचे चक्रपाणी वसाहत येथे ओमसाई इलेक्ट्रिकल्स अँड गॅस रिपेअर्स नावाचे दुकान आहे. दुकान चालविण्यासाठी आरोपीने मार्च २०२४ पासून बिरादार यांच्याकडे दरमहा १२०० रुपये खंडणी मागितली होती. १ जुलै रोजी त्याने कोयता दाखवून १००० रुपये ऑनलाईन घेतले. आतापर्यंत आरोपीने २० हजार २०० रुपये जबरदस्तीने घेतले असून परिसरात दहशत पसरवली होती.

Lok Janshakti Party : लोक जनशक्ती पार्टी रामविलासचे आयकर कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन


परवानगीशिवाय जनावरांची वाहतूक ( Pimpri Chinchwad Crime News 09 July 2025 )

पुनावळे परिसरात भारत पेट्रोल पंपाजवळ एका ट्रकमध्ये परवानगीशिवाय व चारा-पाण्याची व्यवस्था न करता ३२ जनावरांची वाहतूक करताना एक चालक आढळून आला. ही घटना ८ जुलै रोजी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली.

रविकुमार हरीप्रसाद जोशी (४०, गोवंडी, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल दिलीप शंकर साबळे (३२) यांनी रावेत पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या ताब्यातील सहा लाख रुपयांच्‍या टाटा आयशर ट्रकमध्ये ९६ हजार रुपये किमतीची ३२ जनावरे कुठल्याही वैध परवान्याविना व अन्न-पाण्याशिवाय दाटीवाटीने भरलेली आढळून आली. या प्रकरणी प्राण्यांच्या छळविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे..


रिटायर्ड व्यक्तीची २० लाखांची फसवणूक ( Pimpri Chinchwad Crime News 09 July 2025 )

रिटायर्ड व्यक्तीला पेन्शन चालू करण्याच्या बहाण्याने मोबाइलवर ओटीपी घेत सहा बँक खात्यांवर तब्बल २० लाख रुपये ट्रान्सफर करून निवृत्त व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ही घटना २ जुलै ते ३ जुलै दरम्यान देहुरोड परिसरात घडली.

जगदीशचंद्र बनिक (६०, देहुरोड) यांनी मंगळवारी (८ जुलै) याबाबत देहूरोड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीस फोन करून पेन्शनसाठी अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले. नंतर सहा बँक खाते व्यक्तीच्या बँक खात्याशी जोडण्यास सांगितले. व्यक्तीकडून ओटीपी घेऊन खात्याशी लिंक केलेल्या चार खात्यांमध्ये प्रत्येकी ५ लाख रुपयांची रक्कम फिर्यादीच्या बँक ऑफ इंडिया खात्यातून ट्रान्सफर केली. या प्रकारात एकूण २० लाखांची फसवणूक झाली आहे.

Maval: शॉर्टसर्कीटच्या आगीत दोघे गंभीर भाजले, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू


शेजाऱ्यांकडून कुटुंबास मारहाण ( Pimpri Chinchwad Crime News 09 July 2025 )

वाकड परिसरात एका युवकाच्या घरात घुसून महिलांसह अन्य नातेवाईकांवर प्लास्टिक खुर्च्या व दगडाने हल्ला करण्यात आला. ही घटना ५ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास वाकडमधील कलाटे नगर येथे घडली.

या प्रकरणी संतोष चंद्रकांत चक्रे (४२), निलेश आल्हाट (३७) आणि त्यांच्यासोबत असलेले महिलेसह अन्य दोन-तीन नातेवाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुर अविनाश पाटील (२४, वाकड) यांनी मंगळवारी (८ जुलै) वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेवत असताना त्यांच्या घराच्या टेरेसवर महिला आरोपीने काचेची बाटली फेकून दिली. याबाबत विचारणा करण्यासाठी गेल्यावर संतोष चक्रे याने फिर्यादीचा गळा दाबला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या आई आणि लहान बहिणीच्या डोक्यात व पायावर खुर्चीने मारून जखमी केले. तुटलेल्या खुर्च्यांनंतर रस्त्यावरचे दगड उचलून फिर्यादीच्या काका आणि पत्नीच्या पोटावर मारून जखमी केले. अन्य दोन ते तीन आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच महिलांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याच गदारोळात अनोळखी आरोपीने पट्ट्याने मारहाण करत असल्याचे फिर्यादीत म्‍हटले आहे.

Follow Us On