situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 09 August 2025 : काळेवाडीत वेटरला लोखंडी हँडलने मारहाण

Published On:
Pimpri Chinchwad Crime News 09 August 2025,

Team My pune city –  गाडी बाजूला घेतल्‍याच्‍या ( Pimpri Chinchwad Crime News 09 August 2025) वादातून वेटरवर लोखंडी हँडलने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्‍या सुमारास काळेवाडी येथील प्यासा बारमध्ये  घडली.

ज्ञानेश्वर उर्फ मामा शिवदास माकणे (वय ४०, रा. फ्लॅट नं. १०३, साई दर्शन सोसायटी, ताथवडे) व पंडित अशोक अंदगुले (वय ३६, रा. शिवतीर्थनगर, रहाटणी) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. सुखाचार्य दारबा हळनर (वय १९, रा. शिंदेवस्ती, मारुंजी) असे जखमी व्‍यक्‍तीचे नाव असून त्‍यांनी शुक्रवारी (दि. ८) याबाबत काळेवाडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी हळनर हे प्यासा बारमध्ये वेटर म्हणून काम करत आहेत. कोल्ड ड्रिंकची गाडी बारसमोर आल्याने फिर्यादी दुचाकी गाडी बाजूला करत होते. त्‍यावेळी आरोपींनी त्याला कोणाला विचारून गाडीला हात लावला, असे म्‍हणत शिवीगाळ केली. आरोपी पंडीर याने शटरच्‍या लोखंडी हँडलने फिर्यादीच्या डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. या प्रकरणाचा अधिक तपास काळेवाडी पोलीस करीत आहेत.

Rakshabandhan : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जवानांसाठी पाठवल्या राख्या

कॉलेज गेटवर विद्यार्थ्यावर कोयत्याने वार ( Pimpri Chinchwad Crime News 09 August 2025)

कॉलेजच्या मेन गेटवर धक्का लागल्याच्या कारणावरून दोन तरुणांनी विद्यार्थ्यावर मारहाण करून लोखंडी कोयत्याने वार करीत जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. ८) दुपारी साडेबारा वाजताच्‍या सुमारास काळभोरगनर, चिंचवड येथील आयआयबीएम इन्स्टिट्यूट, जेट इंडिया कॉलेजसमोर घडली.

मोहित अनंत लांडगे (वय २२, रा. रावेत) आणि शिवम वाळुंज (रा. भोसरी) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. अभिषेक दीपक साठे (वय २२, रा. शिवराईनगर, बिबवेवाडी, पुणे) असे जखमी तरुणाचे नाव असून त्‍यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कॉलेजमधील बाथरूममध्‍ये गेले असता त्‍यांचा धक्‍का आरोपी मोहित लांडगे याला लागल्‍याने त्‍याने शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तर आरोपी शिवम वाळुंज याने लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर हल्ला केला. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Fraud : शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने साडेनऊ लाखांची फसवणूक

गॅस चोरी प्रकरणी तरुणावर गुन्‍हा ( Pimpri Chinchwad Crime News 09 August 2025)

 घरगुती गॅसची चोरी करून तो इतर सिलेंडरमध्‍ये भरत असल्‍याच्‍या कारणावरून तरुणावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ८) सायंकाळी सात वाजताच्‍या सुमारास भोसरी येथील धावडेवस्ती भागात असलेल्‍या बाबा आनंद मंगल कार्यालयाजवळील प्रकाश गॅस सर्व्हिसेस दुकानात उघडकीस आली.

मंगेश दिगंबर भोयर (वय ३४, रा. अंकुशनगर, भोसरी) असे गुनहा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. गुन्‍हे शाखा युनिट एकमधील पोलीस हवालदार महादेव गजेंद्र जावळे (वय ४३) यांनी शुक्रवारी याबाबत भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे आवश्यक परवाना नसतानाही ज्वालाग्राही पदार्थाच्या साठवणुकीसंबंधी कोणतीही सुरक्षितता न बाळगता गॅस भरण्याचा प्रकार सुरू होता. याबाबत माहिती मिळाल्‍यावर पोलिसांनी छापा घालून हा प्रकार उघडकीस आणला. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

मेफेड्रॉन विक्री प्रकरणी तरुणास अटक ( Pimpri Chinchwad Crime News 09 August 2025)

 मेफेड्रॉन विक्री प्रकरणी पोलिसांनी एका तरुणास अटक केली आहे. गुरुवारी (दि. ७) रात्री पावणे अकरा वाजताच्‍या सुमारास विनोदेवस्‍ती, हिंजवडी येथे ही कारवाई करण्‍यात आली.

कैलास मोहन राम (वय २७, रा. चिखली. मूळ रा. जोधपूर, राजस्‍थान) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. गुन्‍हे शाखा युनिट चारमधील पोलीस अंमलदार रवि प्रकाश पवार यांनी शुक्रवारी (दि. ८) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्‍यची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यानुसार पोलिसांनी विनोदेवस्‍ती कमानीजवळ सापळा लावून आरोपी कैलास राम याला ताब्‍यात घेतले. त्‍याची झडती घेतली असता त्‍यांच्‍याकडे मॅफेड्राॅन नावाचाा एक लाख १३ हजार ४०० रुपये किंमतीचा ११.३४० ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ मिळून आला. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Follow Us On