situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 08 July 2025 : रासे येथे दारूभट्टीवर छापा

Published On:
Crime News

Team My pune city – खेड तालुक्यातील रासे येथे ओढ्याच्या बाजूला सुरु असलेल्या दारू भट्टीवर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने छापा ( Pimpri Chinchwad Crime News 08 July 2025) मारला. या कारवाई मध्ये २.८७ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (७ जुलै) सकाळी करण्यात आली.

अर्जुन बिरबल राठोड (४१, शिंदे वस्ती, रासेफाटा, खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल अमर कदम यांनी चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी अर्जुन याने रासे गावात ओढ्याच्या काठावर दारूभट्टी लावली. याबाबत मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला माहिती मिळाली. पोलिसांनी दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी दोन लाख ८७ हजार रुपये किमतीचे आठ हजार २०० लिटर रसायन नष्ट केले.

Director of Town Planning : पिंपरी-चिंचवड व पुणे शहराच्या नगर रचना संचालकपदी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती 


गॅस सिलेंडरमधून अवैध रीफिलिंग ( Pimpri Chinchwad Crime News 08 July 2025)

बालेवाडी येथील जय मल्हार गॅस सर्व्हिस सेंटरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून इतर सिलेंडरमध्ये अवैध रीफिलिंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे जिवीतास धोका निर्माण झाला होता. ही घटना ६ जुलै रोजी सायंकाळी नांदे रोड, बालेवाडी येथे उघडकीस आली.

या प्रकरणात संतोष मनोहर बंडगर (२२, नांदे रोड, बालेवाडी) याच्याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल गोरे यांनी बावधन पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरमधून रीफिलिंग करणे हे अत्यंत धोकादायक असून ज्वालाग्राही पदार्थांबाबत आवश्यक ती खबरदारी न घेता, जाणीवपूर्वक इतर सिलेंडरमध्ये आरोपी गॅस भरत होता. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी संतोष बंडगर याच्या विरोधात कारवाई केली आहे.

Siddha Ganesh Dhol Pathak : श्री सिद्ध गणेश ढोल ताशा पथकाचा वाद्यपूजन सोहळा व सराव शुभारंभ उत्साहात संपन्न


ट्रॅव्हल्स बसच्‍या धडकेत दुचाकीस्वार जखमी ( Pimpri Chinchwad Crime News 08 July 2025)

पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव वेगातील ट्रॅव्हल्स बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा हात फॅक्चर झाला. हा अपघात सोमवारी (७ जुलै) सकाळी चाकण जवळ वाकी खुर्द येथे घडला.

या प्रकरणी बस (एनएल ०१/ए ३१९६) वरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश गजानन बाविस्वर (२९, वाकी, खेड) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी मोटारसायकलमध्ये हवा भरण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गाने जात होते. चाकण जवळ वाकी खुर्द येथे भरधाव ट्रॅव्हल्स बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर पडले. या अपघातात त्यांच्या उजव्या हातावरून बसचे चाक गेल्याने हात व बोटांना गंभीर फ्रॅक्चर झाले.

Follow Us On