Team MyPuneCity – ताथवडे परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका ट्रक चालकास जबर मारहाण करून लुटण्यात ( Pimpri Chinchwad Crime News 07 May 2025) आले. ही घटना मंगळवारी (दि. 6) पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी बंडु मुकिंदा शेळके (वय 43, रा. माऊली माता मंदिराजवळ, ता. हिंगणा, जि. नागपूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी शैलेश विकास सरोदे (वय 20, रा. सुभाष छाजेड नगर, बोपोडी, पुणे), आशिष संतोष सोजवळ (वय 26, रा. सर्वे नं. 24, कमळाबाई बहिरट चाळ, बोपोडी, पुणे), साहील सलीम शेख (रा. खडकी बाजार, पुणे), आणि ऋषीकेश निलेश शिंदे (रा. बोपोडी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 मे रोजी पहाटे 3 च्या सुमारास बंडु शेळके हे त्यांच्या आयशर कंपनीचा ट्रकमध्ये शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीच्या गेटजवळ, अशोक नगर, ताथवडे येथे झोपलेले होते. त्यावेळी दोन दुचाकीवरून चार आरोपी आले. त्यांनी ट्रकमध्ये झोपलेल्या फिर्यादीस जबरदस्तीने खाली उतरवले. आरोपींनी दमदाटी, शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच कोयत्याचा धाक दाखवून खिशातून दोन हजार 100 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तपास करीत आरोपी सरोदे, सोजवळ, आणि शेख यांना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दिघी परिसरात खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा ( Pimpri Chinchwad Crime News 07 May 2025)
दिघी परिसरातील भंगार व्यवसायिकाला दोन आरोपींनी दमदाटी करत, दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने दुकानात गोंधळ घालून चाकू दाखवून धमकी दिली. ही घटना 2 मे आणि 4 मे रोजी घडली.
हिरामन बबन सुर्यवंशी (वय 58, रा. आदर्शनगर, दिघी) यांनी मंगळवारी (दि. 6) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बादशहा भोंड आणि ंग्रामसिंग गजलसिंग भादा (दोघेही रा. दिघी) यांच्या विरोधता गुन्हा दाखल केला असून आरोपी भादा याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मे आणि 4 मे 2025 रोजी फिर्यादी यांच्या आर्यन इंडस्ट्रीज या नावाच्या भंगार दुकानात आरोपी आले. 2 मे रोजी आरोपी बादशहा याने फिर्यादीकडे दारू पिण्यासाठी 500 रुपये मागितले. पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्याने शिवीगाळ केली आणि पैसे दिले नाहीस तर तुझे दुकान चालू देणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर जबरदस्तीने 500 रुपये घेऊन निघून गेला.
यानंतर, 4 मे रोजी आरोपी संग्रामसिंग हा दुकानावर आला. त्यानेही दारू पिण्यासाठी 1000 रुपये मागितले. पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्याने गोंधळ घालत उद्यापासून दुकान उघडायचं नाही, उघडलेस तर फोडून टाकीन अशी धमकी दिली. गर्दी जमा झाल्याचे पाहून त्याने कमरेतील चाकू बाहेर काढला आणि हवेत फिरवत मी दिघीचा भाई आहे, मला ओळखत नाहीस का? असे म्हणत नागरिकांमध्ये भीती निर्माण केली. त्यावेळी महिला व नागरिक पळून गेले. आरोपीने दमदाटी करत पुन्हा 500 रुपये घेऊन घटनास्थळावरून निघून गेला. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
हिंजवडी परिसरात गांजासह एकास अटक ( Pimpri Chinchwad Crime News 07 May 2025)
हिंजवडी परिसरात एका व्यक्तीकडून गांजा जप्त करत केला. ही घटना मंगळवारी दुपारी वाकड-हिंजवडी लिंक रोडवर घडली.
या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारमधील पोलीस नाईक वासुदेव उद्धवराव मुंढे (वय 40) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संजय नारायण जाधव (वय 47, रा. माधव अपार्टमेंट, श्रीधर नगर, दत्त मंदिराजवळ, चिंचवड) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 6 मे रोेजी दुपारी 3.00 वाजताच्या सुमारास वाकड-हिंजवडी लिंक रोडवरील अॅटलंटा सोसायटी शेजारी, मधुबन चौकाजवळ आरोपीला संशयावरून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात 246 ग्रॅम वजनाचा, 12 हजार 300 रुपये किमतीचा गांजा आढळून आला. पोलीस उपनिरीक्षक कांदे याबाबत अधिक तपास करीत आहेत.
हिंजवडी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणी जखमी ( Pimpri Chinchwad Crime News 07 May 2025)
एका अज्ञात वाहनाने तरुणीला धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास हिंजवडी परिसरातील पुणे-मुंबई महामार्गावर होंडाई शोरूम समोर घडली.
याप्रकरणी पोलीस शिपाई विकास बापुराव कारले (वय 28) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होंडाई शोरूमसमोर पुण्याकडून मुंबईकडे जाणार्या महामार्गावर एक अज्ञात वाहनचालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून अंदाजे 20 ते 25 वयोगटातील एका अनोळखी महिलेस जोरदार धडक दिली. या धडकेत ती महिला गंभीर जखमी झाली. अपघातानंतर चालक पळून गेला. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
MLA Shankar Jagtap : पाकिस्तानला धडा शिकवणारी कारवाई ; ‘ऑपरेशन सिंदूर’वर आमदार जगतापांची ठाम भूमिका
महाळुंगे एमआयडीसी येथे बसखाली सापडून तरुणाचा मृत्यू ( Pimpri Chinchwad Crime News 07 May 2025)
कामावर जाणार्या दुचाकीस्वार तरुणाचा भरधाव बसखाली सापडून मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 6) सकाळी 6.40 वाजण्याच्या सुमारास महाळुंगे एमआयडीसी परिसरातील दवणे वस्ती येथे घडला.
रमेश भुरा लोधी (वय 30, रा. वाघजाई नगर, ता. खेड, जि. पुणे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (एमएच 14 एलएल 4812) या बसवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश लोधी आणि त्यांचा मित्र प्रभाकर हे दोघेजण दुचाकीवरून कामावर जात होते. दरम्यान, आंबेठाण गावच्या हद्दीत दवणे वस्ती ते महाळुंगे गावाकडे जाणार्या रस्त्यावर ते आल्यानंतर, रस्त्यावरील पाण्यामुळे दुचाकी घसरली. त्यामुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. त्याचवेळी समोरून भरधाव वेगातील बसखाली सापडून फिर्यादीचा मित्र प्रभाकर याचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
पिंपरीतील गांधी नगर येथे दारूच्या नशेत शेजार्याला काठीने मारहाण ( Pimpri Chinchwad Crime News 07 May 2025)
एका व्यक्तीस शेजार्याने दारूच्या नशेत काठीने मारहाण करत जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 5) पिंपरीतील गांधी नगर येथे घडली.
धनाजी बाबुराव कांबळे (वय 36, रा. कैलास कदम चाळ, गांधी नगर, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी समीर सलील शेख (वय 31, रा. कैलास कदम चाळ, गांधी नगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास काही एक कारण नसताना आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. फिर्यादीने याबाबत विचारणा केली असता आरोपीने दारूच्या नशेत त्यांना धक्काबुक्की केली व बोळात पडलेल्या लाकडी काठीने त्यांच्या उजव्या डोळ्याजवळ कपाळावर मारून किरकोळ दुखापत केली. संत तुकाराम नगर पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
Talegaon Dabhade : मुख्यमंत्री कृती कार्यक्रमात तळेगाव दाभाडे व चिखली पोलीस ठाण्यांचा प्रथम क्रमांक
चाकण येथे जमिनीच्या व्यवहारात दीड कोटींची फसवणूक ( Pimpri Chinchwad Crime News 07 May 2025)
आधीच इतर व्यक्तीस विकलेली जमीन पुन्हा एकदा दुसर्या व्यक्तीस विकून एक कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना चाकण येथे घडली. याप्रकरणी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी 61 वर्षीय ज्सेष्ठ नागरिकाने मंगळवारी (दि. 6) याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनीचार महिला आरोपींसह राहूल हनुमंत शेलार आणि दीपक रामचंद्र मोकाशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 19 ऑक्टोबर 2022 ते 17 मे 2023 या कालावधीत चाकण येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
आरोपींनी आपसांत संगनमत करून चाकण जवळील 1 हेक्टर 60 आर ही मालमत्ता फिर्यादीस विकल्याचे सांगितले. सदर मालमत्ता सन 2005 मध्येच मिरा शिवाजीराव जाधव (रा. कोथरुड, पुण)े यांना विकलेली असतानाही पुन्हा फिर्यादी यांना विकल्याचे भासविले. या व्यवहारासाठी फिर्यादीकडून एकूण 2 कोटी 24 लाख रुपयांचे करार करण्यात आला. त्यापैकी 1 कोटी 65 लाख रुपये त्यांनी आरोपींना दिले. मात्र व्यवहार पूर्ण करून मिळकत ताब्यात न देता आरोपींनी खोटे साठेखत व खरेदीखत तयार करून फसवणूक केली. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.