situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 07 July 2025 : कंपनीचे कंत्राट घेतल्याने एकास जीवे मारण्याची धमकी

Published On:
Hinjawadi Crime News

Team My pune city – ॲटलास कॉपको कंपनीचे ट्रान्सपोर्टचे कॉन्ट्रॅक्ट घेतल्याच्या कारणावरून सहा जणांनी मिळून एका व्यावसायिकाला जीवे( Pimpri Chinchwad Crime News 07 July 2025) मारण्याची धमकी दिली. ही घटना चार जुलै रोजी सायंकाळी खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे घडली.

अक्षय अंकुश इंगळे (32, शेलपिंपळगाव, खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहन दौंडकर, निलेश दौंडकर आणि इतर चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय यांच्या भावाने ॲटलास कॉपको या कंपनीचे ट्रान्सपोर्टचे कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे. या कारणावरून आरोपींनी अक्षय यांच्या घराच्या दरवाजावर लाथा मारून दहशत निर्माण केली. त्यानंतर अक्षय यांच्या भावाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. एका व्यक्तीने अक्षय यांना कंपनीचे काम करू नको म्हणून फोन करून धमकी दिली.


स्वतंत्र खोली देण्याच्या कारणावरून एकास मारहाण ( Pimpri Chinchwad Crime News 07 July 2025)

माझ्यासोबत राहणाऱ्या व्यक्तीला दुसरी स्वतंत्र खोली का देत नाही असे म्हणत एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (5 जुलै) रात्री मोरवाडी पिंपरी येथे घडली.

जादू विमल दास (36, मोरवाडी, पिंपरी. मूळ रा. पश्चिम बंगाल) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जोगेश मारा (मोरवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश याला फिर्यादी दास यांनी त्यांच्यासोबत राहणाऱ्या व्यक्तीला स्वतंत्र खोली देण्याची मागणी केली. या कारणावरून जोगेश याने दास यांना हातोडीने डोक्यात आणि हाताला मारून गंभीर दुखापत केली.


गाडीचा हॉर्न वाजविल्याने व्यावसायिकाच्या डोक्याला लावले पिस्तूल ( Pimpri Chinchwad Crime News 07 July 2025)

पुढे जाण्यासाठी रस्ता देत नसल्याने कार चालकाने हॉर्न वाजवला. या कारणावरून समोर जाणाऱ्या कार चालकाने कार आडवी लावून हॉर्न वाजवणाऱ्या कार चालकाच्या डोक्याला पिस्तूल लावले. तसेच कार चालकाच्या गळ्यातून सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना रविवारी (6 जुलै) रात्री तळवडे रोड, त्रिवेणीनगर येथे घडली.

विकी विजय भालेराव (36, तळवडे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकी यांचा रविवारी वाढदिवस होता. ते मारुंजी येथे वाढदिवस साजरा करून मित्र प्रनिकेत जगताप आणि अनिकेत चौधरी यांच्यासोबत कारमधून घरी येत होते. तळवडे रोड येथे समोरून जाणारी कार वेडी वाकडी वळणे घेत जात होती. त्यामुळे विकी यांचा मित्र अनिकेत चौधरी यांनी हॉर्न वाजविला. त्या कारणावरून आरोपींनी त्यांची कार रस्त्यात आडवी लावली. त्यानंतर आरोपींनी विकी यांच्या डोक्याला पिस्तूल लावून त्यांना मारहाण करत धमकी दिली. तसेच एका आरोपीने विकी यांच्या कमरेला असलेले पिस्तूल काढून घेतले. विकी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आरोपींनी हिसकावून घेतली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On