situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 06 June 2025 : मुलीच्या मृत्यूप्रकरणी तीन वर्षांनी गुन्हा दाखल

Published On:
Pimpri Chinchwad Crime News 22 July 2025

Team MyPuneCity – लिफ्टसाठी खोदलेल्या खड्यात पडून अडीच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना 17 जुलै 2022 रोजी निघोजे गावातील बिंद्रा इंडस्ट्रीजमध्ये (Pimpri Chinchwad Crime News 06 June 2025) घडली.

तापसी सोनु सिरसवाल असे मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. विशाल सोनावणे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. सहायक पोलीस निरीक्षक राकेश उद्देसिंग गुमाने (40) यांनी तब्बल तीन वर्षांनी गुरुवारी (5 जून) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनु सिरसवाल हे बिंद्रा इंडस्ट्रीज येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. त्या कामाचे कंत्राट आरोपी विशाल सोनवणे याने घेतले होते. 17 जुलै 2022 रोजी दुपारी 3.30 वाजता बिंद्रा इंडस्ट्रीजमध्ये आरोपीने लिफ्टसाठी खोदलेला खड्डा झाकला नव्हता. याच खड्ड्यात सोनू यांची मुलगी तापसी खेळता खेळता खड्यात पडली. त्यात तिचा मृत्यू झाला.


जुन्या वादातून चौघांकडून मारहाण

त्रिवेणीनगर चौकात चौघांनी मिळून तिघांना डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (4 जून) सायंकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान घडली.

सुनील मेंगडे, कपिल जाधव, ऋषिकेश आणि अशोक मेंगडे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलसांनी मेंगडे आणि ऋषिकेश यांना अटक केली आहे. बाळासाहेब बाबासाहेब खामकर (32, तळवडे) असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्यांनी बुधवारी गुरुवारी (5 जून) याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जून 2025 रोजी संध्याकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान फिर्यादी व त्यांच्या मित्रांना त्रिवेणीनगर चौकात बोलावून आरोपींनी शिवीगाळ केली. त्यानंतर दगड व लाथाबुक्यांनी मारहाण केली. यामध्ये फिर्यादी व त्यांच्या दोन मित्रांना गंभीर दुखापत झाली.


विद्यानगरमध्ये तरुणावर चाकूहल्ला (Pimpri Chinchwad Crime News 06 June 2025)

लघुशंकेसाठी बाहेर पडलेल्या तरुणावर तीन जणांनी चाकूने हल्ला करून जखमी केले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री सव्वाएक वाजताच्या सुमारास विद्यानगर, चिंचवड येथे घडली.

राजपूत (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) व त्याचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. राजेश बाबू कुमार (24, विद्यानगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जून रोजी रात्री 1.15 वा. फिर्यादी घराबाहेर आले असता आरोपींनी त्यांना जवळ बोलावले. फिर्यादी गेले नाहीत म्हणून आरोपींनी शिवीगाळ केली आणि त्यांच्यावर कांदा कापण्याच्या चाकूने हल्ला करून पाठीवर व मानेवर गंभीर जखमा केल्या.


हातभट्टीसाठी साठवलेले 50 हजारांचे रसायन जप्त (Pimpri Chinchwad Crime News 06 June 2025)

हातभट्टीसाठी साठवलेले 50 हजार रुपयांचे रसायन पोलिसांनी जप्त केले. गुरुवारी (5 जून) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास मरकळ येथे ही कारवाई करण्यात आली.

मोरंती चरणसिंग राजपूत (रा. मरकळ, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट तीनमधील पोलीस अंमलदार योगेश्वर औदुंबर कोळेकर यांनी गुरुवारी (5 जून) याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अंदाजे 50 हजारांचे 1000 लिटर कच्चे रसायन साठवून त्यावर बेकायदेशीर हातभट्टी लावलेली आढळून आली. पोलिसांनी या हातभट्टीवर छापा टाकून कारवाई केली.


चिखलीत मेफेड्रॉनसह एकजण अटकेत (Pimpri Chinchwad Crime News 06 June 2025)

मेफेड्रॉन विक्रीसाठी आलेल्या एकाला 7.48 ग्रॅम अंमली पदार्थसह मुंबईतील एकास अटक केली. गुरुवारी सायंकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास जाधववाडी, चिखली येथे ही कारवाई केली.

अमीरअली असगरअली सिद्दिकी (32, भांडुप (पश्चिम), मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट एकमधील पोलीस अंमलदार प्रमोद रोहिदास गर्जे यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून सात लाख 48 हजार 900 रुपयांचा मेफेड्रॉन व 10 हजार रुपयांचा मोबाइल जप्त करण्यात आला. त्याने हा मेफेड्रॉन परवेज हसन खान (अंधेरी, मुंबई) याच्याकडून विकत घेतल्याचे निष्पन्न झाले.

Follow Us On