situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 06 July 2025 : हप्ता देण्यास उशीर झाल्याने दोघांना ठार मारण्याचा प्रयत्न

Published On:

Team My Pune City –अंडा भुर्जीची गाडी चालवणाऱ्या व्यावसायिकाने हप्ता देण्यास उशीर केल्याने सहा जणांनी मिळून गाडीवर काम करणाऱ्या दोघांचे अपहरण करून कोरेगाव खुर्द येथील जंगलात नेऊन त्यांच्यावर खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (5 जुलै) सायंकाळी घडली.

राहुल देवकिसन चव्हाण (21, खेड), तुषार सुपे अशी जखमींची नावे आहेत. राहुल यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नारायण सुनील गावटे (25), ऋषिकेश बाळू रोकडे (27), रोशन गणपत गोगावले (22), अनिल शांताराम शिंदे (24), गणेश हिरामण लिंबोरे (24) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नारायण, ऋषिकेश आणि रोशन यांना अटक केली आहे.

Alandi :देवशयनी आषाढी एकादशी निमित्त माऊली मंदिरात भाविकांची गर्दी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल हे विशाल देशमुख यांच्या अंडा भुर्जी गाडीवर काम करतात. आरोपींनी विशाल देशमुख यांच्याकडे अंडा भुर्जीचा व्यवसाय करण्यासाठी दर महिन्याला दहा हजार रुपये खंडणीची मागणी केली. मागील काही महिन्यांपासून आरोपीला विशाल देशमुख खंडणी देत होते. मात्र मागील महिन्यात खंडणी देण्यासाठी उशीर झाला या कारणावरून आरोपींनी अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करणारे राहुल चव्हाण आणि तुषार सुपे यांना कार मध्ये जबरदस्तीने बसवून त्यांचे अपहरण केले. खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्द येथील जंगलात नेऊन त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला.


जाधववाडी मध्ये आठ वाहने पेटवली; एकास अटक

चिखली मधील जाधववाडी येथे एका व्यक्तीने सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली आठ वाहने पेटवली. यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले. ही घटना शनिवारी (5 जुलै) रात्री साहिलपुरम हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली.

गणेश निवृत्ती मराठी (53, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बाळासाहेब प्रमोद खरात (32) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खरात आणि आरोपी गणेश मराठे हे एकाच सोसायटी मध्ये राहतात. खरात यांच्या होंडा शाईन दुचाकीची पेट्रोल टाकीचा पाइप काढून आरोपीने आग लावली. त्याशिवाय सोसायटीत पार्क असलेल्या इतर सात दुचाकींना व एका इलेक्ट्रिक मोटारसायकलला आग लावण्यात आली. यामुळे इमारतीसही धोका निर्माण झाला होता. आरोपीने हे कृत्य जाणीवपूर्वक केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी गणेश मराठे याला अटक केली आहे.


ट्रकची दुचाकीस धडक; दोघे जखमी

अज्ञात ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एका दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. ही घटना ३ जुलै रोजी पहाटे च-होली बु. परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ घडली.

तानाजी शिवाजी खांडेकर (६०, शिवाजी वाडी, मोशी) असे जखमी झालेल्‍या दुचाकीस्‍वाराचे नाव असून त्‍यांनी दिघी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रासह दुचाकीने जात असताना, अज्ञात ट्रक चालकाने वाहतूक नियम धाब्यावर बसवत त्यांच्या दुचाकीस मागून जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादीच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांचा मित्र प्रितम महाले किरकोळ जखमी झाला. तसेच दुचाकीचे नुकसान झाले. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला.


धारदार शस्‍त्राने वार करीत तरुणाचा खून

एका तरुणावर धारदार शस्‍त्राने वार करीत खून करण्‍यात आला. ही घटना ४ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपासून ते ५ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजताच्‍या दरम्‍यान पठारे मळा, चऱ्होली येथील प्राईल्ड वर्ल्ड सिटीमधील सेक्युरिटी केबिन जवळ उघडकीस आली.

धनुदादा लकडे (३३) असे खून झालेल्‍या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ सोमनाथ दादा लकडे (२१, आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादीचा मोठा भाऊ याच्यावर कोणीतरी अज्ञात इसमाने चऱ्होली येथील प्राईल्ड वर्ल्ड सिटी येथील सेक्युरिटी केबिन जवळ घातक शस्त्राने डोक्यावर वार करून गंभीर जखमी करत खून केला. आरोपीचा शोध सुरू आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.


बांधकाम साईटवरून सव्‍वादोन लाखांच्या साहित्याची चोरी

डुडूळगाव येथील ‘डिस्टीनेशन ऑस्टीया’ या बांधकाम साईटवरील स्टोअर रूम फोडून अज्ञात चोरट्याने दोन लाख २२ हजार रुपये किमतीच्या हार्डवेअर व किरकोळ साहित्याची चोरी केली. ही घटना ३० जून ते १ जुलै या कालावधीत उघडकीस आली.

गिरीष दिलीप काळे (३७, रावेत) यांनी दिघी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ३० जून संध्याकाळी ७ ते १ जुलै सकाळी डुडूळगाव येथील डी.आर. गव्हाणे लँडमार्क कंपनीच्या ‘डिस्टीनेशन ऑस्टीया’ या साईटवरील स्टोअर रूमचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दोन लाख २२ हजार ४६५ रुपयांचे साहित्य चोरून नेले.


वृद्ध महिलेचे ३० हजारांचे दागिने लांबवले

जमतानी चौकात ७० वर्षीय महिलेला रस्ता क्रॉस करताना मदतीच्या बहाण्याने दोन अज्ञात चोरट्यांनी विश्वास संपादन करून तिचे ३० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (५ जुलै) सकाळी दहा वाजताच्‍या सुमारास घडली.

याप्रकरणी ७० वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता जमतानी चौकाजवळ फिर्यादी महिला रस्ता ओलांडत असताना, दोन चोरट्यांनी तिला मदतीचा हात देत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ४ ग्रॅम सोन्याचे मणी, १.५ ग्रॅमचे कर्णफूल आणि १ ग्रॅमचे ‘ओम’ पेंडल असा एकूण ६.५ ग्रॅम वजनाचे असे एकूण ३० हजार रुपये किमतीचे दागिने असलेला बटवा घेऊन ते निघून गेले.


पिंपळे सौदागरमधील महिलेची २१ लाखांची फसवणूक

एका महिलेला फसवून बनावट ‘सीबीआय अधिकारी’, ‘सुप्रीम कोर्ट न्यायाधीश’ अशी बतावणी करून २१ लाख रुपयांची सायबर फसवणूक केली. ही घटना पिंपळे सौदागर परिसरात २६ जून ते ४ जुलै दरम्‍यान घडली.

ट्रॉयड डिपार्टमेंट (अनोळखी इसम), प्रदीप सावंत, संदीप रॉय, के. शीवा सुब्रमन्यम, सीबीआय डायरेक्टर सांगणारा व्यक्ती, सुप्रीम कोर्ट न्यायाधीश सांगणारा व्यक्ती, द जिन्स शॉप व ए टी कर्नावल या नावाचे बँक खातेधारक यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. याबाबत पिंपळे सौदागर येथे राहणाऱ्या ३९ वर्षीय महिलेने शनिवारी (५ जुलै) सांगवी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, २६ जून ते ४ जुलै दरम्यान फिर्यादीला ट्रॉय डिपार्टमेंटमधून बोलत असल्‍याचे सांगून फिर्यादी यांच्‍या आधार कार्डचा वापर करून सिम काढल्याची माहिती दिली. या कार्डवरून अश्लील मजकूर व मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक होईल अशी धमकी देण्यात आली. सीबीआय, सुप्रीम कोर्टच्या नावाने धमकी देत तिचा विश्वास संपादन करण्यात आला. खात्यातील रक्कम डिजिटल चलन व्हेरिफाय करण्याचे कारण सांगून २१ लाख रुपये फसवून घेतले.


उंचावरून पडून कामगाराचा मृत्यू

चिंचवड एमआयडीसीतील साईटेक कंपनीत काम करत असलेल्या कामगाराचा सुरक्षेच्या अभावामुळे उंचावरून पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (३ जुलै) दुपारी साडेचार वाजताच्‍या सुमारास घडली.

चिंचवड एमआयडीसी येथील साईटेक इंजिनिअरिंग कंपनीचे मालक साईनाथ शिंदे (मोशी) यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल झाला आहे. संतोष राम माने (४०) असे मयत कामगाराचे नाव असून याबाबत त्‍यांच्‍या ३८ वर्षीय पत्‍नीने शनिवारी (५ जुलै) पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ३ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास फिर्यादीचे पती संतोष माने साईटेक कंपनीत लिफ्टच्या शेजारी काम करत असताना हेल्मेट व सुरक्षा बेल्ट न दिल्यामुळे ते लोखंडी फाउंडेशनवर पडले. यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

रस्‍त्‍यातील गाडी बाजूला घेण्‍यास सांगितल्‍याने तरुणास मारहाण

रस्त्यातून जात असताना दोन व्यक्तींनी मोटारसायकल आडवी लावल्यामुळे झालेल्या वादातून तीन जणांनी मिळून एका तरुणाला रस्त्यातच बेदम मारहाण करत नाकाचे हाड फॅक्‍चर केले. ही घटना शनिवारी (५ जुलै) सायंकाळी सात वाजताच्‍या सुमारास थेरगाव येथे घडली.

मयुर नवले (२३) व त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजित हिरामन एखंडे (३८, थेरगाव) असे जखमी झालेल्‍या तरुणाचे नाव असून त्‍यांनी याबाबत काळेवाडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ५ जुलै रोजी सायंकाळी फिर्यादी धनगरबाबा मंदिराजवळून जात असताना आरोपींनी मोटारसायकल आडवी लावली. रस्ता सोडण्यास सांगितल्यामुळे मयुर नवले याने शिवीगाळ करत नाकावर बुक्क्यांनी मारहाण केली. त्याचे साथीदारही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकी देत निघून गेले. या मारहाणीत फिर्यादी यांच्‍या नाकाचे हाड फॅक्‍चर झाले.

Follow Us On