Team My pune city – एका तरुणाला अंधारात ( Pimpri Chinchwad Crime News 06 August 2025)अडवून कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाइल, चांदीचे ब्रॅस्लेट आणि रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतले. ही घटना रविवारी (३ ऑगस्ट) रात्री घडली. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
आक्याभाई उर्फ आकाश सुभाष आल्हाट (२९, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच त्याच्या तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियाज मोहम्मद अन्सारी (३०, रावेत) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अन्सारी हे रविवारी रात्री एस.बी. पाटील कॉलेज रोडवरील बालाजी ट्रेडर्सजवळून शिंदेवस्तीकडे कच्च्या रस्त्याने जात होते. त्यावेळी स्कुटी व मोटारसायकलवर आलेल्या चार जणांनी अन्सारी यांना अडवले. यातील एका आरोपीने ‘आक्याभाई’ असे नाव सांगून फिर्यादीच्या खिशातील मोबाइल आणि रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. विरोध केल्याने त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि छत्रीच्या दांड्याने मारहाण केली. घटनास्थळी मदतीला आलेल्या दोन तरुणांनाही आरोपीने कोयता दाखवून पिटाळून लावले. रावेत पोलीस तपास करीत आहेत.
Molest Case : विद्यार्थिनींचे लैगिंक शोषण करणार्या शिक्षकाचे महापालिका सेवेतून निलंबन
भाडेकरूने घातला सुरक्षा रक्षकाला गंडा ( Pimpri Chinchwad Crime News 06 August 2025)
एका भाडेकरूने वृद्ध सुरक्षा रक्षकाची फसवणूक करत त्यांच्या नावावर खोटे कागदपत्र वापरून सहा लाख ५५ हजार रुपयांची चारचाकी गाडी खरेदी केली. ही घटना संतोषनगर, थेरगाव येथे घडली.
संदेश संकेत जुंद्रे (३५, चिंचपोकळी, मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जयाजीराव दामोदर शिंदे (६४, जांबेगाव, ता. मुळशी) असे फसवणूक झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२४ पासून थेरगाव येथील साई इंडिया पार्कमध्ये आरोपी भाड्याने राहण्यास आला होता. त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन खोट्या कागदपत्रांद्वारे मोबाइल सिमकार्ड, बँक खाते, क्रेडिट कार्ड सुरू केले. याच नावाने सह्याद्री मोटर्स बाणेर येथून गाडी खरेदी करत ६.५५ लाखांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक ( Pimpri Chinchwad Crime News 06 August 2025)
एका टपरीवरून पोलिसांनी ३६ हजार रुपयांचा गुटखा आणि सुगंधी तंबाखू विक्री करताना एकास अटक केली. ही कारवाई निगडी येथील अंकुश चौकात मंगळवारी (५ ऑगस्ट) दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास करण्यात आली.
जैनुद्दिन अब्बास शेख (३५, रुपीनगर, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल जय दौंडकर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी फैजल पान शॉप व टी सेंटर या टपरीत अमली पदार्थ विरोधी पथकाने करवाई केलि. या करवाई मध्ये आरोपीकडून प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, तंबाखू यासह रोख रक्कम आणि मोबाईल मिळून एकूण ३६ हजार ६३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
Kamshet Crime News : कामशेत येथे नागरिकांनीच पकडले चोराला
पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक ( Pimpri Chinchwad Crime News 06 August 2025)
पिस्टल बाळगल्या प्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून की पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई सोमवारी (४ ऑगस्ट) रात्री औंध जिल्हा रुग्णालयाच्या समोर करण्यात आली.
संजय दिलीप घाडगे (१९, सुस, मुळशी), रोहन हनुमंत ओव्हाळ (२०, सुस, मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आकाश खंडागळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध जिल्हा रुग्णालयाच्या समोर जुनी सांगवी येथे दोघेजण दुचाकीवरून पिस्टल घेऊन आल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून संजय आणि रोहन या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २५ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल, ५०० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस आणि ५० हजार रुपये किमतीची एक दुचाकी जप्त केली आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.