Team My pune city –दारूच्या नशेत असलेल्या दोन आरोपींनी एका जोडप्याला शिवीगाळ व मारहाण( Pimpri Chinchwad Crime News 05 August 2025) केली. या घटनेत तिसऱ्या आरोपीने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पेन्डल जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना रविवारी (३ ऑगस्ट) सायंकाळी गांधीनगर, पिंपरी येथे घडली.
याप्रकरणी महिलेने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संदेश उर्फ मोन्या सुनिल गायकवाड (२२, गांधीनगर, पिंपरी), शुभम उर्फ सोन्या सुनिल गायकवाड (२३, गांधीनगर, पिंपरी), पवन सचिन ससाने (२०, गांधीनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या पतीसोबत मिठाई विकण्यासाठी जात होत्या. त्यावेळी आरोपी क्रमांक संदेश आणि शुभम दारूच्या नशेत आले. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केली. याचवेळी आरोपी पवन याने महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पॅन्डल जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि तेथून पळून गेले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.
Accident : कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
भागीदाराच्या बनावट सह्या करून ४.७७ कोटींची फसवणूक ( Pimpri Chinchwad Crime News 05 August 2025)
भागीदाराच्या बनावट सह्या आणि कागदपत्रे बनवून १०४.५ गुंठे जागेवरील गोदामाच्या भाड्यापोटी आलेले १० कोटींपेक्षा जास्त रुपये आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. त्यातील अर्धी रक्कम भागीदाराला न देता फसवणूक केली आहे. ही घटना १७ एप्रिल २००७ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत कुरुळी, ता. खेड येथे आहे.
या प्रकरणात श्रीकांत मोहन ठुसे (६१, कर्वेनगर, पुणे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार भाऊसाहेब नाना पटारे, एक महिला आरोपी, गणेश भाऊसाहेब पटारे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुळी येथील १०४.५ गुंठे जागेवरील गौरी वेअर हाऊसमध्ये फिर्यादी ५० टक्के नोंदणीकृत भागीदार आहेत. आरोपींनी संगनमत करून गुन्हेगारी कट रचला. त्यांनी फिर्यादीच्या नावाच्या बनावट सह्या करून, बनावट कागदपत्रे तयार केली आणि ती कागदपत्रे खरी असल्याचे भासवून ती जागा स्वतःची असल्याचे दाखवले. त्यानंतर गोदामाच्या भाड्यापोटी आलेले १० कोटी ६९ लाख ८८ हजार १८२ रुपये स्वीकारले. त्यापैकी इतर खर्च जाता उर्वरित ५० टक्के रक्कम (४ कोटी ७७ लाख ९९ हजार ९१ रुपये) फिर्यादीला न देता ती रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरून त्यांची फसवणूक केली. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
निष्काळजीपणामुळे डोळ्याला गंभीर दुखापत ( Pimpri Chinchwad Crime News 05 August 2025)
एका क्रेनवरील चार व्यक्तींनी हलगर्जीपणाने आणि निष्काळजीपणामुळे गाडी उचलत असताना, गाडी उचलण्यासाठी असलेल्या रॉडमुळे एका व्यक्तीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना २५ जुलै रोजी चऱ्होली फाटा येथे घडली.
या प्रकरणात शुभम मगरध्वज बिरादार (२८, भोसरी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. क्रेन (एमएच०३/ सीडी ११९७) वरील चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्यांच्या क्रेनने फिर्यादी यांची गाडी उचलत होते. त्यावेळी फिर्यादी क्रेन थांबवण्यास सांगत होते. गाडी उचलत असताना, क्रेनच्या रॉडचे टोक फिर्यादीच्या उजव्या डोळ्याच्या बुबुळाला लागले. त्यामुळे त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. दिघी पोलिस तपास करत आहेत.
Sunil Shelke : लोणावळा नगरपरिषदेच्या गलथान कारभारावर आमदार सुनील शेळके यांचा थेट हल्लाबोल!
पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण, ऑटोरिक्षाची तोडफोड ( Pimpri Chinchwad Crime News 05 August 2025)
जुन्या वादातून चौघांनी मिळून एका तरुणाला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी सिमेंटचा गट्टू डोक्यात फेकून मारल्याने तरुण गंभीर जखमी झाला. तसेच तरुणाच्या ऑटो रिक्षाची तोडफोड करून नुकसान केले. ही घटना सोमवारी (४ ऑगस्ट) रात्री खराळवाडी, पिंपरी येथे घडली.
याप्रकरणी प्रथमेश सतीश टंकसाळे (२३, खराळवाडी, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रोहित मल्लिकार्जुन होसमनी (२०, पिंपळे गुरव), साहिल वंजाळे (२४, पिंपरी), अभिषेक प्रधान (२०, पिंपरी), ओंकार कदम (२५, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या भावासोबत झालेल्या वादाच्या रागातून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी ओंकार याने सिमेंटचा गट्टू हातात घेऊन फिर्यादीच्या डोक्यात फेकून मारला, ज्यामुळे त्यांना हनुवटीवर आणि डोक्यात दुखापत झाली. या घटनेत आरोपींनी ऑटोरिक्षाची तोडफोड करून नुकसान केले. संत तुकारामनगर पोलिस तपास करत आहेत.